Advertisement

रेल्वे स्थानकांवर लवकरच मॅकडोनाल्ड्स, KFC चे स्टॉल्स उघडणार

भारतीय रेल्वेने स्थानकांवर एका नव्या प्रकारच्या स्टॉल्स उभारण्याच्या धोरणाला मंजुरी दिली आहे.

रेल्वे स्थानकांवर लवकरच मॅकडोनाल्ड्स, KFC चे स्टॉल्स उघडणार
SHARES

 रेल्वेने गेल्या आठवड्यात रेल्वे स्थानकांवर लोकप्रिय ब्रँड्सचे लहान स्टॉल्स लावण्याच्या धोरणाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता रेल्वे स्थानकांवर तुम्हाला मॅकडोनाल्ड्स, KFC सारखे ब्रँड्सचे स्टॉल दिसू शकतात. 

खार, कांदिवली आणि इतर उपनगरी स्थानकांवर बांधल्या जात असलेल्या नव्या उंच डेक्सवर आता मॅकडोनाल्ड्स, KFC, हल्दीराम्स यांसारख्या मोठ्या फूड ब्रँड्सचे स्टॉल्स उभारणे शक्य होणार आहे.

ट्रेन प्रवाशांच्या अन्न अनुभवात सुधारणा करण्यासाठी भारतीय रेल्वेने स्थानकांवर एका नव्या प्रकारच्या स्टॉल्स म्हणजे ‘प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स’ना मंजुरी दिली आहे. यामुळे मॅकडोनाल्ड्स, KFC, सबवे, हल्दीराम्स आणि इतर नामांकित ब्रँड्सना प्लॅटफॉर्मवर स्टॉल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिड-डेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार, रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे की, ही आउटलेट्स नामनिर्देशनाच्या पद्धतीने दिली जाणार नाहीत. या निर्णयामुळे 2017 च्या केटरिंग धोरणात आणखी एक चौथा प्रकार जोडला गेला आहे.

यापूर्वी स्टॉल्सचे वर्गीकरण चहा/बिस्किट/स्नॅक्स स्टॉल्स, दूध बूथ आणि ज्यूस/ताज्या फळांचे काउंटर असे होते. नव्याने जोडलेला प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट प्रकार खास करून टॉप-टियर ब्रँडेड चेनसाठीच लागू आहे.


हेही वाचा

'या' तारखेला नवी मुंबईहून पहिले विमान सुटणार

ठाणे-नवी मुंबई-भाईंदर दरम्यान पॉड टॅक्सी धावणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा