Advertisement

'निसर्ग' खवळला! जाणून घ्या रेड, ग्रीन, ऑरेंज अलर्टचा अर्थ

आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. जाणून घ्या त्याचे अर्थ....

'निसर्ग' खवळला! जाणून घ्या रेड, ग्रीन, ऑरेंज अलर्टचा अर्थ
SHARES

३ जून रोजी निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारट्टीला धडकणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना या चक्रीवादळामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी राज्याचं आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे.

मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार आणि अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्यावेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

रेड अलर्ट : नागरिकांनी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर सतर्क रहावे, यासाठी रेड अलर्ट यासाठी जारी करण्यात येतो. लोकांनी स्वतःला सुरक्षित ठेवावे आणि धोकादायक भागात जाणे टाळावे असा या अलर्टचा अर्थ होतो. मोठे नुकसान रेड अलर्टच्या वेळी होण्याची शक्यता वर्तवली जाते.

ऑरेंज अलर्ट : नैसर्गिक आपत्ती कोणत्याही क्षणी येऊ शकते, हे सूचित करण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. नागरिकांनी संकटासाठी तयार रहावे म्हणून हा अलर्ट देण्यात येतो. पावसामुळे मुंबईत आपत्ती ओढावू शकते, हे सांगण्यासाठी सुरुवातीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्याचबरोबर या अलर्टमध्ये गरज असेल आणि महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडण्याचा निर्णय घ्या, असंही सांगितलं जाते. या अलर्टद्वारे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.

येलो अलर्ट : हवामानातील बदलामुळे नैसर्गिक संकट ओढावू शकतं, दैनंदिन कामं रखडू शकतात. त्यामुळे येलो अलर्ट सावधगिरी बाळगण्याच्या हेतून जारी करण्यात येतो.

ग्रीन अलर्ट : सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ग्रीन अलर्ट दिला जातो. कोणतंही संकट नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे असा याचा अर्थ होतो. या अलर्टमध्ये उदाहरणार्थ येत्या ४८ तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाग देतं. या अलर्टनंतर खबरदारी म्हणून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.



हेही वाचा

निसर्ग चक्रीवादळ: दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला पालिकेचं आवाहन

निसर्ग चक्रीवादळाचा धोका, बीकेसीतल्या कोरोना रुग्णांना 'या' स्थळी हलवलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा