Advertisement

निसर्ग चक्रीवादळाचा धोका, बीकेसीतल्या कोरोना रुग्णांना 'या' स्थळी हलवलं

Cyclone Nisarga च्या पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्ला कॉमप्लेक्स (BKC) इथं ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा धोका, बीकेसीतल्या कोरोना रुग्णांना 'या' स्थळी हलवलं
SHARES

३ जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ (Cyclone Nisarga) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल. तर या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. मुंबईच्या दिशेनं हे चक्रिवादळ येत आहे. यासाठी NDRF च्या टिम देखील सज्ज आहे. याच पार्श्वभूमीवर वांद्रे कुर्ला कॉमप्लेक्स (BKC) इथं ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.


बीकेसीला धोका?

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. आतापर्यंत ६० रुग्णांची गोरेगाव आणि वरळी इथल्या कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली आहे.


रुग्णांना 'इथं' हलवलं

निसर्ग चक्रीवादळाचा बीकेसीतील नव्यानं उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरलाही बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यानं या कोविड सेंटरमधील रुग्णांना इतरत्र हलवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ६० रुग्णांना वरळी येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. तर काहींना गोरेगाव येथील कोविड सेंटरमध्ये नेण्यात येत आहे. बीकेसीतील कोविड सेंटरमधील इतर वैद्यकीय सुविधाही सुरक्षित ठेवण्याची तयारी करण्यात आली आहे.


अवघ्या काही तासात धडकणार

दरम्यान, हवामान खात्यानं दिलेल्या ताज्या माहितीनुसार बुधवारी मुंबईसह पालघर, अलिबागच्या किनाऱ्यांवर हे चक्रीवादळ धडकणार आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला त्याचा मोठा फटका बसणार आहे.

सध्या मंगळवारी ३ वाजता वादळाचं चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. सध्या गोव्याजवळ हे चक्रीवादळ पोहोचलं आहे. हळूहळू किनारपट्टी आणि चक्रीवादळातील अंतर कमी होत आहे. याशिवाय हे वादळ अलिबागला धडकणार आहे. त्यामुळे अलिबागला एनडीआरएफच्या चार टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

१२९ वर्षांनंतर चक्रीवादळ

हवामान खात्यानुसार, १८९१ नंतर प्रथमच अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात वादळाची परिस्थिती उद्भवली आहे. १९४८ आणि १९८० मध्ये यापूर्वी दोनदा असे चक्रीवादळ आले होते.  


हेही वाचा

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?

निसर्ग चक्रीवादळ: दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला पालिकेचं आवाहन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा