Advertisement

निसर्ग चक्रीवादळ: दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला पालिकेचं आवाहन

चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी जी उत्तर विभागातील समुद्रालगत राहणाऱ्या जनतेला मुंबई महापालिकेने आवाहन केलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ:  दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला पालिकेचं आवाहन
SHARES
Advertisement

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.  महानगरपालिकेचा मुख्य नियंत्रण कक्ष आणि विभागवार नियंत्रण कक्ष पुरेशा मनुष्यबळासह सज्ज करण्यात आले आहेत. 

चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी  जी उत्तर विभागातील समुद्रालगत राहणाऱ्या जनतेला मुंबई महापालिकेने आवाहन केलं आहे. आवश्यकता भासल्यास नागरिकांनी पालिकेने सोय केलेल्या शाळांमध्ये स्थलांतरीत व्हावे असं आवाहन पालिकेने दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला केलं आहे. दादर विभागाकरिता गोखले रोड मनपा शाळा व भवानी शंकर  मनपा शाळा आणि माहीम करिता न्यू माहीम मनपा शाळेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. तरीही आवश्यकता भासल्यास त्यांनी सदर शाळांमध्ये स्थलांतरित व्हावे, असं पालिकेने म्हटलं आहे. 

मुंबईतील सर्व २४ विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विभागातील संभाव्य धोके पोहोचू शकणाऱ्या वसाहती तसंच सखल भागातील वसाहती निश्चित करुन तेथील नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.हेही वाचा -

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?
संबंधित विषय
Advertisement