Advertisement

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी


रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे मुंबईची लाइफलाइन मागील २ महिने ठप्पं होती. त्यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करता येत नव्हता. रेल्वेनं नियमीत पणे कामाला जाणाऱ्या प्रवाशांनी पास काढले आहेत. मात्र, लोकल बंद असल्यानं प्रवाशांना पासाचे पैसे वजा होण्याची भिती सतावत आहे. परंतु, मुंबई उपनगरी लोकल सेवाही बंद आहे. त्यामुळे पासचे पैसे वाया गेल्याने रेल्वे प्रशासनाने पासचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली.

अत्यावश्यक सेवा वगळता रेल्वे सेवा बंद आहे. एक्स्प्रेसच्या प्रवाशांना तिकीट परतावा मिळत आहे. त्यामुळं पासही वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. रेल्वेच्या उपनगरी सेवेचा लाभ सुमारे ७५ लाख प्रवासी घेतात. दोन्ही मार्गावर लाखो पासधारक आहेत. मासिक, त्रैमासिक पासधारकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. त्यांच्याकडून रेल्वेला पासाच्या रूपात आगाऊ रक्कम मिळते. मात्र, लॉकडाउनमुळे पासाचे पैसे वाया गेले. त्यामुळे या कालावधीत ज्यांनी पास काढले त्यांची पासाची तारीख वाढवून द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

हेही वाचा - प्रवाशांच्या सोयीसाठी २ हजार टॅक्सी रस्त्यावर

यासंदर्भात रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पासधारकांविषयी त्यांनी त्वरित निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. तसंच, यासंदर्भात रेल्वे मंत्रालय लोकल सुरू होण्याआधी निर्णय घेईल, अशी माहिती मिळते. 

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, तरिही अनेक प्रवासी लोकलमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळं रेल्वे कामगारांसाठी सुरू असलेल्या विशेष लोकलमध्ये गर्दी होत असल्यानं कोरोना संसर्गाची शक्यता असून, रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. यामुळं त्रासलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सोमवारी विद्याविहार स्थानकात रेल रोको केला.



हेही वाचा -

यंदा १२ वीचा निकाल १० जूनला नाही लागणार, विद्यार्थ्यांना पहावी लागणार वाट

१२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रिवादळ, IMD नं केला फोटो प्रसिद्ध



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा