Advertisement

प्रवाशांच्या सोयीसाठी २ हजार टॅक्सी रस्त्यावर


प्रवाशांच्या सोयीसाठी २ हजार टॅक्सी रस्त्यावर
SHARES

लॉकडाऊनमुळं मागील २ महिने बंद असलेली टॅक्सी सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून मुंबईत विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्यानं रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेकरीचा मुंबईतील तब्बल २००० टॅक्सी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळते. प्रवाशांकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, वांद्रे टर्मिनल्स इथं ही टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेळेत गाडी पकडण्यास मिळावी यासाठी काही तास अगोदर स्थानकात पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळं, प्रवशांना स्थानकात पोहोचण्यासाठी टॅक्सीसाठी शोधा-शोध करावी लागू नये यासाठी तसंच, प्रवाशांची तारांबळ उडू नये म्हणून रेल्वे स्थानकांवर मुंबई टॅक्सी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लॉकडाउनमध्ये टॅक्सी सेवा बंद असल्याने अनेक चालकांची, त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. आता टॅक्सी सेवा काही अंशी सुरू झाल्याने दिलासा मिळेल्याचं मुंबई मेन्स टॅक्सी युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोक्स यांनी म्हटलं.

हेही वाचा - मुंबईतील 'या' ५ स्थानकांसाठी टॅक्सीसेवा

टॅक्सी सेवेवेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी समाजिक अंतर आणि निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर टॅक्सी बुकिंग करता येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर दिल्लीवरून काही रेल्वेगाड्या मंगळवारी येणार असून प्रवाशांनी ५०० टॅक्सींचे बुकिंग आधीच केल्याचं समजतं. तर, सीएसएमटीवर टॅक्सी चालक थांबत असून, त्यांना १८ नंबर प्लॅटफॉर्मकडे सोडलं जात नाही. तसंच, त्या ठिकाणी जाणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आल्याची नाराजी स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे मुंबई अध्यक्ष के. के. तिवारी यांनी व्यक्त केली.

परिवहन आयुक्तालयानं या चालकांना मोठा दिलासा दिला असून, सोमवारपासून विशेष रेल्वे धावणार असल्यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयानं घेतला आहे. टॅक्सींसाठी ताटकळत राहणे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.



हेही वाचा -

१२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रिवादळ, IMD नं केला फोटो प्रसिद्ध

यंदा १२ वीचा निकाल १० जूनला नाही लागणार, विद्यार्थ्यांना पहावी लागणार वाट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा