Advertisement

मुंबईतील 'या' ५ स्थानकांसाठी टॅक्सीसेवा


मुंबईतील 'या' ५ स्थानकांसाठी टॅक्सीसेवा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राडज्यात लॉककडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं वाहतूक सेवा देणाऱ्या रिक्षा-टॅक्सीची सेवा मागील २ महिने पुर्णपणे ठप्प होती. त्यामुळं या चालकांवर आर्थिक संकट आलं आहे. परंतु, परिवहन आयुक्तालयानं या चालकांना मोठा दिलासा दिला असून, सोमवारपासून विशेष रेल्वे धावणार असल्यामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयानं घेतला आहे. टॅक्सींसाठी ताटकळत राहणे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध राहणार आहे. टॅक्सींच्या माध्यमातून 'घर ते स्थानक' आणि 'स्थानक ते घर' या टप्प्यांसाठी ही टॅक्सी सेवा असणार आहे. टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी स्थानकावरच मुंबई टॅक्सी मेन्स संघटनेचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. 

हेही वाचा - १ जूनपासून राज्यात रिक्षा वाहतूक सुरू करावी - शशांक राव

ही टॅक्सी सेवा प्रवाशांना बुकींगच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे ज्या प्रवाशांना टॅक्सी आरक्षित करायची आहे, त्या प्रवाशांनी कॉल करुन अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करायची आहे. शक्यतो प्रवाशांना स्थानकात पोहचण्यापूर्वी किंवा घरातून निघण्यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करायची आहे.

१ जूनपासून देशभरात विशेष प्रवासी रेल्वे चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांतून आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिलेली आहे. यामुळे या गाड्यांतून राज्यांतंर्गत प्रवास करता येणार नाही. खासगी गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या ई-तिकिटांवर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, ५ आसनी वाहनात ३ आणि ७ आसनी वाहनात ५ प्रवाशांना परवानगी असणार आहेल. 

हेही वाचा - टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवरील बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

स्कूटर, मोटार सायकल, रिक्षा यांमधून प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे नियम पाळून प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, प्रवासावेळी मास्कचा वापर अनिवार्य असून टॅक्सीत प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

टॅक्सी प्रतिनिधी क्रमांक


रेल्वे स्थानकटॅक्सी प्रतिनीधीमोबाइल नंबर
सीएसएमटी, मुंबई सेंट्रल, दादर
चंदू नायर 
९८२१६४०४९८
लोकमान्य टिळक टर्मिनस
फरीद 
शशी दुबे 
तुपे 
७९७७७७४८८४
९८३३०८०८००
९०८२८८८३८०
वांद्रे टर्मिनस
देवाडिगा 
कोटीयन 
९०२९८८५९३८
७९७७९२७००९
मुंबई टॅक्सी संघटना प्रतिनिधी
शाम खानविलकर 
८३६९५४५४५७, ८६५५५५१५६२



हेही वाचा -

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी

अवघ्या 15 दिवसात 6 लाख नागरिकांना घरपोच मद्यसेवा, तर इतके गुन्हे दाखल



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा