अवघ्या 15 दिवसात 6 लाख नागरिकांना घरपोच मद्यसेवा, तर इतके गुन्हे दाखल

रविवारी एका दिवसात 63 हजार 962 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली असून अवैध तस्करी करणाऱ्या 6964 जणांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे ही नोंदवलेले आहेत.

अवघ्या 15 दिवसात 6 लाख नागरिकांना घरपोच मद्यसेवा, तर इतके गुन्हे दाखल
SHARES
महाराष्ट्रात 15 ते 31 मे या काळात 6 लाख 68 हजार 645 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली आहे. आज दिवसभरात राज्यात 63 हजार 962 ग्राहकांना घरपोच मद्य करण्यात आली आहे. यापैकी मुंबई शहर, मुंबई उपनगरात 41 हजार 534 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली. यासंदर्भात उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी माहिती दिली आहे. 


राज्यात लाँकडाऊनचे पाचवे चरण सुरू झाले असून सरकारने अनेक नियमात शितीलता आणली आहे. राज्याच्या मद्यविक्रीवरील ही निर्बंध सरकारने उठवल्याने 31 जिल्ह्यात सध्या दारूची आँनलाईन विक्री केली जात आहे.15 मे 2020 पासून 31 मे पर्यंत ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिल्याने राज्याच्या तिजोरीत कमालीची भर पडलेली आहे. या पंधरा दिवसात राज्याच्या तिजोरीत कोट्यावधी रुपये जमा झालेले आहेत.
रविवारी  एका दिवसात  63 हजार 962 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली असून अवैध तस्करी करणाऱ्या 6964 जणांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुन्हे ही नोंदवलेले आहेत.

  राज्यात 15 मे 2020 रोजी पासून ते आतापर्यंत तब्बल 6 लाख 68 हजार 645 ग्राहकांनी आँनलाईन मद्यखरेदी केली आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5,221 अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. 30 मे, 2020 रोजी राज्यात 173 गुन्हे नोंदविण्यात आले असून 51 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.34.36 लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक/दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा