Advertisement

समाजिक अंतराच्या नियमांच उल्लंघन, रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलं रेल रोको आंदोलन


समाजिक अंतराच्या नियमांच उल्लंघन, रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलं रेल रोको आंदोलन
SHARES

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र, तरिही अनेक प्रवासी लोकलमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळं रेल्वे कामगारांसाठी सुरू असलेल्या विशेष लोकलमध्ये गर्दी होत असल्यानं कोरोना संसर्गाची शक्यता असून, रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. यामुळं त्रासलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सोमवारी विद्याविहार स्थानकात रेल रोको केला. 

सीएसएमटीवरून कर्जतला जाणाऱ्या रेल्वे कामगार गाडीसाठी ४०० हून अधिक प्रवासी विद्याविहार स्थानकात थांबले होते. मात्र, गाडीत खूप गर्दी असल्याने आत प्रवेश करायलाही जागा नव्हती. विशेष म्हणजे, करोना संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित वावर नियमांचे खुलेआम उल्लंघन झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी गाडी रोखली. यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीनं अखेर तासाभरानंतर हे आंदोलन मागे घेऊन लोकल रवाना करण्यात आली.

हेही वाचा - रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल; सोशल डिस्टंन्सिंगचे तीन-तेरा

सध्या १८ डब्यांच्या ३ गाड्या मध्य रेल्वेहून धावतात. पश्चिम रेल्वेवर रेल्वे कामगार विशेष गाड्यांची संख्या ९ आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या वाढवण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियननं स्पष्ट केलं. मध्य रेल्वेवर मालवाहतूक गाड्या, श्रमिक एक्स्प्रेस चालवण्यात येत आहेत. विशेष प्रवासी रेल्वे सुरू झाल्यामुळं बहुतांश कामगारांना सोमवारी कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्यानं सोमवारी रेल्वे कामगारांच्या संख्येत वाढ झाली.

लॉकडाऊनमुळं मागील २ महिने बंद असलेली टॅक्सी सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. सोमवारपासून मुंबईत विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्यानं रेल्वे स्थानकांपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेकरीचा मुंबईतील तब्बल २००० टॅक्सी रस्त्यावर उतरल्याची माहिती मिळते. प्रवाशांकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनल्स, वांद्रे टर्मिनल्स इथं ही टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.



हेही वाचा -

१२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रिवादळ, IMD नं केला फोटो प्रसिद्ध

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबही...



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा