Advertisement

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबही...

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबही...
SHARES
Advertisement

टीव्ही मालिका ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका सर्वांनाच माहित आहे. कारण मालिका प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करायची. ही मालिका टीआरपीमध्ये देखील अव्वल होती. आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. फक्त तीच नाही तर तिचं कुटुंब देखील कोरोना पॉझिटिव्ह आलं आहे.

टीव्ही अभिनेत्री मोहेना कुमारी सिंगलाही (Mohena Kumari Singh) कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली आहे. मोहेनाचं कुटुंबच कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. मोहेना कुमारीसह तिच्या कुटुंबातील ५ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

ये रिश्ता क्या कहलाता है या सीरियलमधून मोहेनाला प्रसिद्धी मिळाली होती. नुकतंच तिचं लग्न झालं. तिच्यासह पती, सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यांना ऋषिकेशमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये दिसणारी लक्षणं सौम्य आहेत.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना मोहेनानं सांगितलं की, सुरुवातीला तिच्या सासूला ताप आला. आधी त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली. त्यामुळे त्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्यानंतर त्यांचा ताप कमी होत नाही हे आम्हाला दिसलं. मग आम्ही सर्वांनीच कोरोना टेस्ट केली. आमच्या घरातील बहुतेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान झालं, आमच्यात लक्षणं नव्हती.

मोहेना ही राजघराण्यातील आहे. मध्य प्रदेशातील रेवाचे राजा पुष्पराज सिंग यांची ती कन्या आहे. रेवाची राजकुमारी असलेल्या मोहेनाचं नुकतंच लग्न झालं. हरिद्वारमध्ये थाटात तिचा विवाहसोहळा पार पडला.हेही वाचा

आईच्या मृतदेहाजवळ खेळणारा 'तो' चिमुकला, आता जबाबदारी उचलणार मीर फाऊंडेशन

मजुरांचा मसिहा.. सोनू

संबंधित विषय
Advertisement