Advertisement

मुंबईच्या दिशेनं चक्रीवादळ, काय कराल आणि काय नाही?

वादळात सामान्य नागरिकांनी कशी काळजी घ्यावी? काय करावं आणि काय करू नये? यासंदर्भातील काही मुद्दे मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी....

मुंबईच्या दिशेनं चक्रीवादळ, काय कराल आणि काय नाही?
SHARES

कोरोनाचं गंभीर संकट असताना त्यात आता निसर्ग चक्रिवादळाचं (Cyclone) आव्हान राज्य प्रशासनासमोर येऊन ठेपलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्ट्यामुळे येणाऱ्या वादळाचं चक्रीवादळात रूपांतर झालं आहे. निसर्ग असं या चक्रिवादळाचं नाव आहे. आता हे चक्रिवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्यानं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

३ जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ मुंबई (MUmbai Weather) शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. यामुळे महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. मुंबईच्या जिशेनं हे चक्रिवादळ येत आहे. यासाठी NDRF च्या टिम देखील सज्ज आहे.

पण या वादळात (cyclone nisarga) सामान्य नागरिकांनी कशी काळजी घ्यावी? काय करावं आणि काय करू नये? यासंदर्भातील काही मुद्दे मुंबई लाइव्हच्या वाचकांसाठी....

काय कराल?

  • घरातच राहा आणि घराची काळजी घ्या. जर तुमचं घर सुरक्षित नसेल तर तात्काळ घर खाली करून दुसरीकडे स्थलांतर करावं.
  • तुमच्या घरातील फरश्या, खिडक्या, दरवाजे खराब स्थितीत असतील तर त्यांची तातडीनं दुरुस्ती करून घ्या.
  • घराच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी करा. मेलेली आणि उन्मळत आलेली झाडं काढून टाका.
  • सखल भागातल्या समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहा. उंच ठिकाणी वेळेत पोहोचा.
  • जर तुमचं घर उंचावर असेल तर तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सुरक्षित जागी जाण्यास सांगितलं तर सूचनांचं पालन करा.
  • जास्त पावसात ज्या ठिकाणी नद्यांना पूर येतो तिथून दूर राहा.
  • धोकादायक इमारतींपासून सतर्क राहा. त्यांच्यापासून दूर राहणंचं योग्य. जर तुम्ही धोकादायक इमारतीत राहत असाल तर पहिलं घर खाली करणं योग्य ठरेलं.
  • रॉकेलचे डबे, शेती अवजारं, बागकामातील अवजारं, फलक अशा वस्तू वादळात धोकादायक ठरतात. वादळात अशा वस्तू तुमच्यावर आदळू शकतात. अशा वस्तू हटवून योग्य ठिकाणी झाकून ठेवा.
  • कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी आपले मोबाइल फोन आधीच चार्ज करा. म्हणजे लाइट गेली तर तुमच्याकडे गरजेच्या वेळी मोबाईल फोन्स असतील.
  • सुरक्षिततेसाठी आणि आवश्यक वस्तूंसाठी आपत्कालीन किट तयार करा.
  • रॉकेलचा कंदील तयार ठेवा. याशिवाय टॉर्च आणि जास्तीचे बॅटरी सेल असतील याची दक्षता घ्या.
  • घरात रेडिओ असेल तर तो सतत सुरू राहील याची दक्षता घ्या. रेडिओवर हवमानाची स्थिती आणि इतर सूचना प्रसारित केल्या जातात. ते काळजीपूर्वक ऐका आणि इतरांनाही त्याची माहिती द्या.
  • विद्युत उपकरणांचा मेन स्विच आणि गॅस पुरवठा बंद करा.
  • कोरडे खाद्यपदार्थ स्वतःजवळ जास्त प्रमाणात ठेवा. गरम पाण्याच्या पिण्याची उपलब्धता ठेवा.
  • दोन चाकी वाहनं मेन स्टँडला उभी करा. जेणे करून ती हवेच्या दाबानं उडून दुसऱ्या गाड्यांवर आदळणार नाही.
  • जर घराला बाल्कनी असेल तर तिथले सर्व सामान काढा. कारण हवेमुळे ते कोणावर पडून जखमी होण्याचा जास्त धोका असतो. 

हे करू नका

  • अफवांवर विश्वास ठेऊ नका. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी विचार करा.    
  • जोपर्यंत आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी सांगत नाहीत, तोपर्यंत सुरक्षित निवारा सोडू नका.
  • वादळ शांत असल्याच्या काळात सुद्धा सुरक्षित निवारा सोडू नका. यावेळी किरकोळ दुरुस्तीची कामं करू शकता.
  • रस्त्यावरील विजेच्या खांबांना लटकणाऱ्या वायर, तारा यांना स्पर्श करू नका.



हेही वाचा

१२९ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे चक्रिवादळ, IMD नं केला फोटो प्रसिद्ध

Mumbai Rain : मान्सूनचे केरळात आगमन, लवकरच दाखल होणार महाराष्ट्रात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा