गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) वर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे पाईपलाईनचे (Pipeline) नुकसान झाले आहे. यामुळे बृहन्मुंबई (mumbai) महानगरपालिकेने (bmc) T वॉर्ड (मुलुंड) मध्ये एक मोठा पाणी पाईपलाईन वळवण्याचा प्रकल्प आखला आहे.
गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत वॉर्डातील काही भागात पाणीपुरवठा (water supply) होणार नाही
दरम्यान नवीन पाईपलाईन पुनर्संचयित झाल्यानंतर किमान 4 ते 5 दिवसांपर्यंत त्यांचे पिण्याचे पाणी उकळून फिल्टर करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) केले आहे.
बांधकाम कामामुळे प्रभावित झालेल्या मॅरेथॉन मॅक्सिमा बिल्डिंग आणि तानसा ब्रिज दरम्यानच्या मार्गावरील पाईपलाईनची पुनर्रचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने करणार आहे
बांधकाम कामामुळे प्रभावित झालेल्या मॅरेथॉन मॅक्सिमा बिल्डिंग आणि तानसा ब्रिज दरम्यानच्या मार्गावरील पाईपलाईनची पुनर्रचना बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे.
बाधित भागात मुलुंड (पश्चिम) मधील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड), जवाहरलाल नेहरू मार्ग (जेएन रोड), देवीदयाळ मार्ग, क्षेपनभूमी (डंपिंग ग्राउंड रोड), डॉ. आरपी मार्ग, पीके मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग (एम. जी. रोड), एनएस मार्ग, एसएन मार्ग, आरएचबी मार्ग, वालजी लाढा मार्ग, व्हीपी मार्ग, मदन मोहन मालवीय मार्ग, एसीसी मार्ग, बीआर मार्ग, गोशाळा मार्ग, एसएल मार्ग आणि नाहूर गाव यांचा समावेश आहे.
हेही वाचा