Advertisement

चक्क मुंबईत गुलाबी पाण्याचं तळं! जाणून घ्या यामागील रहस्य

सध्या हा परिसर चर्चेत आहे तो इथल्या तळ्यातल्या पाण्याच्या गुलाबी रंगामुळे...

चक्क मुंबईत गुलाबी पाण्याचं तळं! जाणून घ्या यामागील रहस्य
फोटो सौजन्य : हिंदुस्तान टाईम्स
SHARES

गुलाबी पाण्याचं (Pink Water) तळं कधी पाहिलंत का हो?... मुंबईसारख्या शहरात हे चित्र पाहायला मिळणं अशक्यच म्हणा... मुंबईत काय जगात असं काही आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण परदेशात  असं एक ठिकाण ऑस्ट्रेलियात आहे. जिथं निराभोळ समुद्र आणि मध्यभागी गुलाबी पाण्याचं तळं... पण आता असं दृश्य ऑस्ट्रेलियातच कशाला मुंबईत देखील पाहायला मिळेल. मुंबईत देखील असंच एक गुलाबी पाण्याचं तळं आढळं आहे.


‘इथं’ आहे गुलाबी तळं?

मुंबईतल्या (Mumbai News) पामबीच मार्गाला लागून असलेली एनआरआय कॉम्प्लेक्स जवळचं तलाव आणि पाणथळ जागा ही विवध स्थलांतरित पक्ष्यांमुळे आणि इथं आढळणाऱ्या जैवविविधतेमुळे प्रसिद्ध आहे. इथं मानवी हस्तक्षेप कमी आहे. त्यामुळे स्थलांतरित झालेले हजारो‌ फ्लेमिंगो पक्षी इथं येऊन वास्तव्य करतात. पण सध्या हा परिसर चर्चेत आहे तो इथल्या तळ्यातल्या पाण्याच्या गुलाबी रंगामुळे...

वरील फोटो पाहून हे फोटोशॉप तर नाही ना? फक्त मध्यभागी असलेल्या तळ्याचा रंग कसा काय गुलाबी होऊ शकतो? कोरोनानंतर आणखी काही संकट तर येणार नाही ना? असे अनेक प्रशन डोक्यात डोकावत असतील. पण हे काही फोटोशॉप वैगरे नाही. 'हिंदुस्तान टाइम्सचे' पत्रकार प्रतिक चोरगे यांनी या गुलाबी पाणथळीचे फोटो कॅमेरात टिपले आहेत. 

मुंबई लाइव्हनं या संदर्भात BHNS च्या सहाय्यक संस्थापक यांच्याशी बातचित केली.

BHNS चं संशोधन सुरू

'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे शास्त्रज्ञ यावर अधिक संशोधन करत आहेत, अशी माहिती BHNS चे सहाय्यक संस्थापक राहुल खोत यांनी मुंबई लाइव्हला दिली. पण गुलाबी पाण्यामागचं नेमकं कारण अजूनही संशोधकांना माहित नाही. पण त्यांच्या मते‌ या पाण्याला‌ हा गुलाबी रंग‌ उष्ण हवामानात‌ आणि खारट पाण्यात ‌वाढणाऱ्या लाल रंगाच्या सुक्ष्म शैवाल-बुरशीमुळे मिळाला आहे. ही बुरशी दमट वातावरणात पाण्यात रंगद्रव्य निर्माण करते आणि ते या पक्षांना आकर्षित ‌करते.

"जगात अनेक ठिकाणी याआधी लाल शैवाळांमुळे असा प्रकार दिसला आहे. पण मुंबईत हे दृश्य ‌पहिल्यांदाच दिसतंय. फ्लेमिंगो हे झोपलॅनकेटॉन नावाचे पाण्यातील जिवाणू खातात, जे या लाल रंगाच्या बुरशीवर जगतात. त्यामुळे त्यांना लाल आणि गुलाबी रंग‌ प्राप्त होतो."

राहुल खोत, सहाय्यक संचालक


नैसर्गिक प्रक्रिया

अशी अनेक तलाव जगभरात अस्तित्त्वात आहेत. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुंबईत असलेल्या या तळ्याचं पाणी किती दिवस गुलाबी राहिल हे सांगता येणं कठिण आहे. राहुल खोत यांच्यानुसार, कदाचित दोन आठवडे किंवा पावसाळ्यापर्यंत अशी परिस्थिती असू शकते. एकदा पावसामुळे तळ्याच्या पाण्यातील खारटपणा कमी झाला की पाण्याचा रंग आहे तसा होईल. 


दुर्मिळ दृश्य

'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'च्या मते मुंबई परिसरात अशा प्रकारचं दुर्मिळ दृश्य पहिल्यांदाच दिसत आहे. त्यामुळे त्यांनी या गुलाबी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेत.

''पाण्याचे नमुने तपासल्यानंतरच पुढील याचं नेमकं कारण कळेल. बीएचएनएसचे सहाय्यक संचालक राहुल खोत आणि त्यांची टीम यावर काम करत आहे. पण सध्या लॉकडाऊन असल्यानं या प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे.”

दिव्यश्री राय, जनसंपर्क अधिकारी

BHNS नुसार मुंबईत पहिल्यांदाच असं चित्र पाहायला मिळालं आहे. पण इथल्या एका स्थानिक महिलेनं मात्र या खाडीत ‌अशाच प्रकारचं गुलाबी पाणी २०१६ मध्येही आपण पाहिलं असल्याचं सांगितलं. महिलेनुसार, ५०० ते ६००० मीटरचा परिसरातील पाण्याचा रंग पिंक झाला होता. रहिवाशांना सुरुवातीला वाटलं की,  हे गुलाबी पाणी एखादं रसायन मिसळल्यामुळे झालं की काय?

मुंबईबाहेर ओडिशाच्या चिल्का सरोवर आणि तामिळनाडूच्या थुथूकोडी इथंही असं गुलाबी पाण्याचं तळं आढळलं होतं. परदेशात असं ऑस्ट्रेलियात समुद्रात गुलाबी पाण्याचं तळ आहे.



हेही वाचा

मुंबईत 'टोळ' की अफवांची टोळी? खरं की खोटं जाणून घ्या फॅक्ट चेक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा