
निवडणुकीच्या तोंडावरच श्रीकांत शिंदे यांना होमपिचवर मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीमधील श्रीकांत शिंदेंच्या विश्वासू नेत्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
डोंबिवलीतील दिवंगत वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी कल्याण-डोंबिवलीमधील अनेक शिवसैनिकांनी भाजपचे कमळ हातात घेतली. या पक्ष प्रवेश सोहळ्याला रवींद्र चव्हाण यांच्याशिवाय अनेक स्थानिक भाजप नेते उपस्थित होते. महापालिका निवडणुकीआधी हा शिंदेंना सर्वात मोठा धक्का मानला जातोय.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघालेले दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुतीतील प्रमूख भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील शिवसेनेचे युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला.
अनमोल म्हात्रे हे केडीएमसीतील माजी दिग्गज नगरसेवक अशी ओळख असलेल्या दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. अनमोल म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीने आज रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतले.
काही दिवसात राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याआधी भाजपकडून जोरदार तयारी कऱण्यात येत आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अनमोल म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
म्हात्रे यांच्यामुळे भाजपची कल्याणमधील ताकद आणखी वाढली आहे. जानेवारी 2026 च्या आधी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे भाजपकडून विशेष लक्ष देण्यात आले आहे. ऑपरेशन लोटस अंतर्गत आता शिंदेंच्या शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे.
हेही वाचा
