जगभरात चर्चेत असणारा, प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवलेला, वादग्रस्त कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस”. सध्या ‘बिग बॉस ओटीटी’ चर्चेत असताना आता मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच ‘मराठी बिग बॉस’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
१९ सप्टेंबरपासून कलर्स मराठी वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होतेय. ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये या वेळेस कोणते ख्यातनाम व्यक्ती जातील याविषयाचे तर्क बांधण्यास देखील सुरुवात झाली आहे.
बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला. तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या. लवकरच प्रेक्षकांची उत्सुकता संपणार आहे.
प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यासाछी बिग बॉसचं घर सज्ज झालं आहे. बिगबॉस मराठीच्या तिसर्या पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमाच्या प्रोमोचे शूट संपवले.
हेही वाचा