Advertisement

ड्रग्स केसमध्ये अडकला राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंह, लवकरच होणार चौकशी

सेलिब्रिटींचं ड्रग्ज प्रकरण (Celebrity drug case) आता पुन्हा चर्चेत आलं आहे.

ड्रग्स केसमध्ये अडकला राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंह, लवकरच होणार चौकशी
SHARES

सेलिब्रिटींचं ड्रग्ज प्रकरण (Celebrity drug case) आता पुन्हा चर्चेत आलं आहे. बाहुबली (Bahubali) फिल्ममधील भल्लालदेव (Bhallaldev) म्हणजे अभिनेता राणा दग्गुबातीला (Rana daggubati) ईडीनं समन्स बजावला आहे. राणासह अभिनेत्री रकुलप्रीत सिंह (Rakulpreet singh) आणि आणखी १० कलाकारांचीही चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे चार वर्षांपूर्वीचं ड्रग्ज प्रकरण आहे. २०१७ साली तेलंगाणा उत्पादन शुल्क विभागानं ३० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होतं. यानंतर १२ प्रकरणं नोंदवण्यात आली. आता ईडीनं या प्रकरणात मनी लाँड्रिंगबाबत कारवाई सुरू केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा उत्पादन शुल्क विभागामार्फत जवळपास १२ प्रकरणांची नोंद आहे. याप्रकरणी ११ चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. बहुतेक ड्रग्ज तस्करांचा यात समावेश आहे. आम्ही उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं आहे. तसंच टॉलीवूड सेलिब्रिटीही पुरावे सापडेपर्यंत साक्षीदारच असतील.

मिळालेल्या माहितीनुसार ईडीनं राणा दग्गुबाती आणि रकुलप्रीत सिंहला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. रकुलप्रीत सिंहला ६ सप्टेंबर, राणा दग्गुबातीला ८ सप्टेंबर आणि रवी तेजाला ९ सप्टेंबरला बोलावण्यात आलं आहे. याशिवाय चरमी कौर, नवदीप, मुमैथ खान, नंदू, तरुण, तनीष आणि रवीचा ड्रायव्हर यांनाही समन्स बजावण्यात आला आहे.



हेही वाचा

मनोज वाजपेयीनं केआरके विरोधात केला मानहानीचा दावा

सलमान खानला रोखणाऱ्या सीआयएसएफच्या जवानाला मिळालं बक्षिस

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा