Advertisement

मनोज वाजपेयीनं केआरके विरोधात केला मानहानीचा दावा

अभिनेता मनोज वाजपेयीनं मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मनोज वाजपेयीनं केआरके विरोधात केला मानहानीचा दावा
SHARES

अभिनेता मनोज वाजपेयीनं मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात केआरके विरोधात तक्रार दाखल केली आहे. मनोजनं तक्रार दाखल केल्याची माहिती त्याचे वकील परेश एस जोशी यांनी दिली आहे.

केआरकेच्या आक्षेपार्ह ट्वीटबाबत न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली आहे. यामध्ये केआरके विरोधात कमल ५०० अंतर्गत खटला दाखल करण्याची विनंती केली आहे.

२६ जुलै रोजी मनोज विरोधात केआरकेनं अपमानास्पद ट्वीट केल्याचं त्या तक्रारीत म्हटलं आहे. यामुळे इंदौरमध्ये असलेल्या चाहत्यांमध्ये अभिनेत्याची प्रतिमा खराब झाली आहे, असं जोशी म्हणाले.

परेश एस जोशी यांनी पुढे सांगितलं की, मनोज स्वत: इंदौरच्या न्यायालयात मंगळवारी उपस्थित होते. त्यावेळी त्यानं जबाब नोंदवला आहे.

दरम्यान, केआरके विरोधात या आधी ही बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं तक्रार दाखल केली होती. त्यावेळी सलमाननं देखील त्याच्या तक्रारीत म्हटलं होतं की केआरकेनं सलमान आणि त्याची कंपनी बिईंग ह्युमन विरोधात अपमानकारक ट्वीट केलं.

‘मी आयुष्यात लुक्खा आणि फालतू नाही, म्हणून मी वेब सीरिज पाहत नाही. तुम्ही सुनील पाल यांना विचारा. पण तुम्हाला एक चरसी, गंजेडी मनोज बघायला का आवडते? आपण फक्त आवडत्या कलाकाराला पाठिंबा देऊ शकत नाही. जर तुम्हाला बॉलिवूडमध्ये चरसी गंजेडीचा तिरस्कार असेल तर तुम्ही प्रत्येकाचा तिरस्कार केला पाहिजे,’ अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले होते.


हेही वाचा

सलमान खानला रोखणाऱ्या सीआयएसएफच्या जवानाला मिळालं बक्षिस

अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायचंय? अॅमेझॉननं दिली ही संधी, जाणून घ्या

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा