Advertisement

अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायचंय? अॅमेझॉननं दिली ही संधी, जाणून घ्या

ही सेवा १९ ऑगस्टपासून लाँच करण्यात आली आहे.

अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायचंय? अॅमेझॉननं दिली ही संधी, जाणून घ्या
SHARES

हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधण्याची आपल्यापैकी अनेकांची इच्छा आहे, पण ती कधी पूर्ण होईल याचा भरवसा नाही. पण आपली तिच इच्छा अॅमेझॉन पूर्ण करणार आहे. कारण आपल्या अलेक्सावर अॅमेझॉननं अमिताभ बच्चन यांचा आवाज लॉन्च केला आहे.

गुगल असिस्टंट आणि सिरीकडे वळणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉननं ही अनोखी शक्कल लढवली आहे. ही सेवा १९ ऑगस्टपासून लाँच करण्यात आली आहे.

अॅमेझॉननं आपल्या बहुचर्चित सेवा Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज लॉन्च केला आहे. जर हा आवाज वापरकर्त्यांना सुरू करायचा असेल, तर त्यांना १४९ रुपये इन्ट्रोडक्टकरी म्हणून मोजावे लागतील. त्यानंतर वापरकर्त्यांना ही सुविधा एक वर्षापर्यंत अनुभवता येईल.

अमिताभ बच्चन यांचा आवाज Alexa वर आपल्याला सुरू करायचा असेल तर आपल्या आवाजात Alexa, introduce me to Amitabh Bachchan, असं म्हणावं लागेल. या व्यतिरिक्त आपल्याला ही सुविधा थेट अॅमेझॉनच्या साईटवरुनही खरेदी करता येईल. पैसे भरल्यानंतर Alexa वरून अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा करण्याची आपल्याला संधी मिळेल.

आपल्याला ही सुविधा सुरू करताना Amit ji हा वेकअप कीवर्ड वापरावा लागेल. त्यासाठी आपल्याला आपल्या आवाजात Alexa, enable Amit ji wake word, असं म्हणावं लागेल. त्यानंतर Alexa बाय डिफॉल्ट काम करेल.

Alexa वर अमिताभ बच्चन यांचा आवाज आणणार असल्याची घोषणा गेल्या वर्षी अॅमेझॉनने केली होती. त्याचा उद्देश अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना तसंच बॉलिवूडच्या चाहत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा होता.



हेही वाचा

महेश मांजरेकर यांना कर्करोगाचं निदान, पार पडली शस्त्रक्रिया

स्कॅम १९९२- हर्षद मेहता स्टोरीवरून सोनी पिक्चर्सवर गुन्हा दाखल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा