राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली, पाच जखमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

आपल्या लाडक्या बाप्पाचं अर्थात लालबाग राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर खोल समुद्रात जात असताना कोळी बांधवांची बोट उलटली. दरम्यान समुद्रात तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर बोटीवरील सर्वांना वाचावण्यात यश आलं आहे. या अपघातात पाच जण जखमी झाले असून जखमींवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

21 तासानंतर विसर्जन

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीपासूनच ते सोमवारी पहाटे विसर्जनापर्यंत भाविकांनी गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं विसर्जन पाहण्यासाठी अनेक भक्त बोटींतून समुद्रात गेले होते. यातील एका बोटीवर जास्त प्रमाणात भक्त असल्यानं ती बोट अचानक उलटली. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना लगेच हा प्रकार लक्षात आल्यानं त्यांनी बोटीच्या दिशेनं धाव घेतली आणि समुद्रात बुडणाऱ्या पाच जणांना बाहेर काढलं.

जखमींची नावं

यामध्ये जखमी झालेल्या पाचही जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काजल मेयर (३१), अदन खान (१५) निलेश भोईर (१८) अनिता (१६) आणि अवनी या पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे.

नायर रुग्णालयान दिलेल्या महितीनुसार, दोन तरुणापैकी एकाच्या डोक्याला तर एकाच्या पायला दुखापत झाली आहे. तर जखमीमध्ये समावेश असलेल्या पाच वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर असून सोळा वर्षीय अनीता हिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.


हेही वाचा -

लालबागच्या राजाचं 21 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन

पुढील बातमी
इतर बातम्या