Advertisement

लालबागच्या राजाचं 21 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन


लालबागच्या राजाचं 21 तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन
SHARES

'गणपत्ती बाप्पा मोरया' या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात रविवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. तर 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन सोमवारी सकाळी करण्यात आलं. मुंबईच्या या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.


बाप्पाचं थाटात विसर्जन

दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात रविवारी गणेशमूर्तींचं थाटात विसर्जन झालं. दरम्यान मुंबईतल्या लालबागच्या राजाला रविवारी सकाळी 10.30 वाजता बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर परिसरातील सर्व गणेशमूर्ती विसर्जनासाठी निघाले.


गिरगाव चौपाटीवर विसर्जन

रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेक मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन झालं नव्हतं. तर गिरगावचा राजा, खेतवाडीचा राजा, फोर्टचा राजा, कुंभारवाड्याचा गणराज, उमरखाडीचा राजा आदी मोठ्या गणेशमूर्तींचं विसर्जन रात्री उशिरा गिरगाव चौपाटीवर करण्यात आलं. तर गणेशगल्लीच्या राजाचं विसर्जन संध्याकाळी झालं. याशिवाय अन्य सर्व मानाच्या गणपतींचं रविवारी विसर्जन झालं. तर 21 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं सोमवारी सकाळी विसर्जन करण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement