Advertisement

नवी मुंबई विमानतळावर डिजीयात्रा ॲपचा वापर होणार

तीन प्रवाशांनी औपचारिकपणे डिजीयात्रा ई-गेट्सचा वापर केला आणि बायोमेट्रिक एंट्री पॉइंट्सवर रिबन-कटिंग केले.

नवी मुंबई विमानतळावर डिजीयात्रा ॲपचा वापर होणार
SHARES

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे ग्रीनफील्ड इंटरनॅशनल गेटवे असलेले नवी मुंबई (navi mumbai) इंटरनॅशनल एअरपोर्ट (NMIA) नव्याने सुरू झालेले महत्त्वाचे विमानतळ आहे.

20 फेब्रुवारी रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डिजीयात्रा (DigiYatra) रोलआउट ही डिजिटल पद्धत नवी मुंबई विमानतळावर सामील करण्यात आली.

उद्घाटनावेळी प्रवाशांसाठी टर्मिनलमध्ये मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या निमित्ताने, तीन प्रवाशांनी औपचारिकपणे डिजीयात्रा ई-गेट्सचा वापर केला आणि बायोमेट्रिक एंट्री पॉइंट्सवर रिबन-कटिंग केले.

डिजीयात्रा विमानतळ चेकपॉइंट्सवर संपर्करहित आणि कागदरहित प्रवासी प्रक्रिया सक्षम करण्यासाठी चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करते.

एनएमआयए अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) पोर्टफोलिओचा एक भाग आहे. जो भारतातील सर्वात मोठा खाजगी एअरपोर्ट ऑपरेटर आहे,

यांच्याद्वारे मुंबई, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, लखनऊ, मंगळुरू आणि तिरुवनंतपुरमसह भारतातील आठ विमानतळांचे व्यवस्थापन करण्यात येते.

या ॲपमुळे ऑनलाईन पद्धतीने विमान तिकीट बुकींग आणि विमान प्रवास सोईचा आणि कमी त्रासदायक ठरणार आहे. 

प्रशासनाकडून हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे अनेक स्तरातून म्हटले जात आहे.



हेही वाचा

कल्याण–तळोजा मेट्रो 12A ला मंजुरी

अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी CBI करणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा