कोरोनामुळं अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतला 'हा' निर्णय

  • मुंबई लाइव्ह टीम
  • उत्सव

कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत दिवसेंदिवस वाढत चालला असून, या व्हायरसच सावट गणेशोत्सवर आलं आहे. दरवर्षी गणेशोत्सवातील ११ दिवस फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईनं सजलेली मुंबई यंदा सजणार नाही. बाप्पाचं आगमन सादेपणाने होणार, त्यातच मुख्यमंत्री यांच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याच्या सूचना यामुळं मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील ११ दिवसांत महापालिकेकडे परवानगीकरिता केवळ २५० मंडळांचे अर्ज आले. दरवर्षी ही संख्या साधारणपणे अडीच ते पावणे तीन हजार इतकी असते. गणेशोत्सवाला अवघा एक महिना उरलेला आहे. मुंबईत १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी जी मंडळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात अशा मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी साधारण ३ हजार मंडळे दरवर्षी पालिकेकडे परवानग्यांसाठी मागणी करत असतात.

यंदा कोरोनाचे संकट आल्यामुळे गर्दी टाळण्यासठी  गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आली आहेत. महापालिकेने यावर्षी गणपती मंडळांना गेल्यावर्षीच्या परवानगीच्या आधारेच मोफत परवानगीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याकरीता सर्व मंडळांना लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग किंवा फैलाव होऊ नये या दृष्टीने या हमीपत्रात पालिकेने अनेक अटी घातल्या आहेत.


हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण


पुढील बातमी
इतर बातम्या