Advertisement

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण

कोरोनाच्या प्रादुर्भावात जबाबदारी ओळखून घोले हे पालिका आणि कोविड रुग्णांच्या सेवेसाठी धावपळ करत होते. बहुदा याच दरम्यान ते कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचे कळते.

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण
SHARES

 मुंबई महानगर पालिका समिती अध्यक्ष (BMC) आणि नगरसेवक अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. अमेय यांना उपचारासाठी सेव्हन हिल रुग्णालयात (Seven Hill Hospital ) दाखल करण्यात आलं आहे.  कोरोनाच्या प्रादुर्भावात जबाबदारी ओळखून घोले हे पालिका आणि कोविड (COVID19) रुग्णांच्या सेवेसाठी धावपळ करत होते. बहुदा याच दरम्यान ते कोरोना पाँझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचे कळते.

हेही वाचाः- लाॅकडाऊनचे उल्लंघन, पोलिसांनी केल्या ९२ हजार गाड्या जप्त

 मुंबईतील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता अहोरात्र झटत आहेत. त्यामुळेच मागील काही दिवसात मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचे पहायला मिळते. याच दरम्यान पालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनाच्या लढाईत घोले हे पहिल्या दिवसांपासून महत्वाची भूमिका बजावत होते. दररोज न चुकता ते कधी महापौरांसोबत तर कधी त्यांच्या इतर अधिकाऱ्यांबरोबर पालिकेच्या सर्व रुग्णालयाचा आढावा घ्यायचे. गरज  पडल्यास रुग्णालयाला भेटही द्यायचे. दरम्यान अमेय यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि आदीत्य ठाकरे यांनी त्याची फोन करून विचारपूस केली.

हेही वाचाः- जी.व्हि.के ग्रुपचे चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्या अडचणीत वाढ,  सीबीआयने फास आवळला

अमेय घोले यांनी करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना सावध केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन घोले यांनी केले आहे. सर्वांच्या आशीर्वाद, सदिच्छा आणि प्रेमाच्या बळावर मी लवकरच बरा होऊन पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होईन, असा विश्वासही घोले यांनी व्यक्त केला आहे.  



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा