Advertisement

बीएमसीतील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची आकडेवारी प्रथमच जाहीर, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना लागण

मागील 2 महिन्यात महापालिकेत किती कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तसेच किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत कर्मचारी संघटनेने माहितीची मागणी केली होती.

बीएमसीतील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची आकडेवारी प्रथमच जाहीर, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना लागण
SHARES
Advertisement

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 57 हजार आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत आढळले आहेत. आतापर्यंत मुंबईत 32 हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. मुंबई महापालिकेच्या  1,529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं आता समोर आलं आहे. मुंबई महापालिकेने प्रथमच पालिकेतील लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं की, पालिकेच्या 1529 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यत कोरोनामुळे 25 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मागील 2 महिन्यात महापालिकेत किती कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली तसेच किती जणांचा मृत्यू झाला, याबाबत कर्मचारी संघटनेने माहितीची मागणी केली होती. त्यांतर संयुक्त नगर आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग) मिलिंद सावंत यांनी 20 मे रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यात कोरोनाबाधित कर्मचारी आणि मृतांच्या संख्येचा उल्लेख आहे.

मुंबई फायर ब्रिगेड आणि सुरक्षा विभागात देखील कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. फायर ब्रिगेडमध्ये  35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. सुरक्षा विभागात 80 हून कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे असून एकाचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी मुंबईत  1002 नवीन कोरोना रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही 32 हजार 974 वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 1065 वर पोहोचली आहे.हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग
संबंधित विषय
Advertisement