Advertisement

मान्सूपूर्व कामे अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता


मान्सूपूर्व कामे अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता
SHARES

पावसाळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिले असून मुंबईतील मान्सूनपूर्व कामं अद्याप रखडली आहेत. एप्रिल महिन्यापासून मान्सूनपूर्व कामाची सुरुवात होते. तसंच हि कामं मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण होतात. परंतु, यंदा कोरोनाचं संकट आल्यानं या कामांना गती मिळालेली नाही. प्रामुख्यानं रस्त्यांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या कापणं अशा कामांचा समावेश आहे. तसंच, नाल्यांची सफाई ही अर्धवट असल्यानं पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका विरोधी पक्षनेते यांनी पालिका आयुक्तांकडं व्यक्त केला आहे.

पावसाळ्याच्या २ महिन्यांत धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडणं, रस्त्यांची दुरुस्ती, उघड्या गटारांवर झाकण लावणं, नाल्यांची सफाई अशी कामं केली जातात. यासाठी ३१ मेची डेडलाइन निश्चित करण्यात येते. परंतु या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळं पावसाळापूर्व कामं लांबणीवर पडली, नालेसफाईच्या कामांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. मात्र, रस्ते दुरुस्ती, धोकादायक झाडांच्या फांद्या कापणं अशी कामं रखडली आहेत.

'यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाळा सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, पावसाळापूर्व कामांची डेडलाइन संपण्यास अवघे ४ दिवस उरल्यामुळं प्रशासनानं स्वत: या कामाचा आढावा घेऊन कामं त्वरित पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्राद्वारे केली आहे.



हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा