Advertisement

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग

हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आगल्याचं समोर येत आहे.

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग
SHARES

मुंबईतील धोबी तलाव इथल्या मेट्रो सिनेमा चित्रपटागृहाजवळ असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आगीचा भडका उडाला आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आगल्याचं समोर येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

फॉर्च्युन हॉटेलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणारे २५ डॉक्टर्स वास्तव्याला होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलानं तत्काळ बचावकार्याला सुरुवात केली. त्यामुळे २५ डॉक्टरांना सुखरुप बाहेर काढता आले. या सर्व डॉक्टरांना ट्रायडंट हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.


घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या ४ जम्बो टँकर दाखल झाले आहेत. शिडिचा वापर करून चौथ्या मजल्यावर अडकलेल्या डॉक्टर्सना बाहेर काढण्यात आलं. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे पूर्ण परिसरात सध्या आगीचे लोण पाहायला मिळत आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा