लाॅकडाऊनचे उल्लंघन, पोलिसांनी केल्या ९२ हजार गाड्या जप्त

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ९७ हजार गुन्हे नोंदवलेले आहेत.

लाॅकडाऊनचे उल्लंघन, पोलिसांनी केल्या ९२ हजार गाड्या जप्त
SHARES

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी पूर्णतहा लाॅकडाऊन (LOCKDOWN) उठवलेला नाही, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनो सावधान, अवैध वाहतूकीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९२ हजार ८३५ जणांची वाहने आतापर्यंत जप्त केलेली आहेत. तर लाॅकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन (Violation of lockdown rules ) केल्याप्रकरणी विरोधात १ लाख ९७ हजार गुन्हे नोंदवलेले आहेत.

हेही वाचाः- अश्लील फोटोच्या मदतीने ‘तो’ करत होता तिला ब्लॅकमेल

राज्यात  लॉकडाऊन २२ मार्च ते २० जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १,९७,५४१ गुन्हे नोंद झाले असून ३१,३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ६ लाख १९ हजार ७९४ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही टवाळ खोरांकडून त्यांच्यावरच प्रतिहल्ला केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.  दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३१५ घटना घडल्या. त्यात ८८१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढीलय कारवाई सुरू आहे.

हेही वाचाः- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०७, ८४२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविलेया काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ९२,८३५ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहे.

पोलिस कोरोना कक्ष

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४७ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५१, ठाणे शहर ७  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई  SRPF १,पालघर २,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, अशा ८८ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९९ पोलीस अधिकारी व १४१० पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा