Advertisement

Lockdown: लाॅकडाऊन हे अंतिम उत्तर नाही, अखेर ‘हा’ नेता मुख्यमंत्र्यांना सांगणार

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यासह विविध जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊनचं पालन केलं. परंतु या लाॅकडाऊनमधून काहीच हाती लागत नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे.

Lockdown: लाॅकडाऊन हे अंतिम उत्तर नाही, अखेर ‘हा’ नेता मुख्यमंत्र्यांना सांगणार
SHARES

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यासह विविध जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊनचं पालन केलं. परंतु या लाॅकडाऊनमधून काहीच हाती लागत नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ज्ञांसमवेत नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत लॉकडाऊन तसंच इतरही अनुषंगिक विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते. (no need to extend lockdown in maharashtra says ncp leader chhagan bhujbal)

लाॅकडाऊन आणि कोरोना संदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाला आळा घालण्यासाठी अजूनही अनेकजण लॉकडाऊन सुरूच ठेवण्याची मागणी करत आहेत. तर यापुढं लॉकडाऊन करू नये अशीही अनेक नागरिकांची मागणी आहे. लॉकडाऊन किती वेळा करावा हा प्रश्न आहे. तसंच ज्या ठिकाणी लॉकडाऊन नव्याने सुरू करण्यात आले आहेत ,या ठिकाणी देखील कोरोनाची साखळी तुटलेली नसून उलटपक्षी लॉकडाऊनच्या भीतीने झालेल्या गर्दीतून मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. परिणामी अर्थचक्र नव्याने सुरू करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - Lockdown: केरळावरून महाराष्ट्रात आलेल्या ४० डॉक्टरांचा पगार अजूनही थकीत

मुंबई प्रमाणे नाशिक शहरातील प्रत्येक दवाखान्यासाठी महापालिकेने संपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करावी व रुग्ण व्यवस्था, प्रवेश, बिल्स, इत्यादी बाबींवर नियंत्रण ठेवण्याची सर्व जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर असेल. त्यांचे संपर्क क्रमांक नागरिकांकडे असावेत. मविप्रचे रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन यापुढे महानगरपालिकेकडे असेल व महानगरपालिका त्यांचे निधीतून या रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचारीवृंद, औषधे व अन्य अनुषंगिक संपूर्ण खर्च भागवेल. महापालिकेने कायमस्वरूपी व्हेंटिलेटर्स  व ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी व अन्य महापालिकांनी ज्या पद्धतीने रुग्णालय अधिगृहित केली आहेत त्या पद्धतीने नाशिक मनपाने या रुग्णालयाचे संपूर्ण व्यवस्थापन करावं. तसंच मविप्र रूग्णालयाच्या सनियंत्रणासाठी अतिरिक्त मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची नियुक्ती करावी, असे निर्देश यावेळी छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा - Dharavi: दादरमधील रुग्ण वाढीचा दर धारावीहून अधिक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा