Advertisement

केरळावरून महाराष्ट्रात आलेल्या ४० डॉक्टरांचा पगार अजूनही थकीत

पालिकेनं या डॉक्टरांची थकबाकी ५ जुलैपर्यंत करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पण अजूनही...

केरळावरून महाराष्ट्रात आलेल्या ४० डॉक्टरांचा पगार अजूनही थकीत
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून केरळमधील ४० डॉक्टर्स महाराष्ट्रात रुग्णांच्या सेवेसाठी आले होते. मात्र या डॉक्टरांचा पगार अजूनही थकित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे यातल्या डॉक्टरांनी पुन्हा केरळाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात यांच्या टिममधील १५ डॉक्टर केरळला रवाना झाले. उर्वरीत डॉक्टरांची तुकडी देखील केरळसाठी रवाना होतील.

पालिकेनं या डॉक्टरांची थकबाकी ५ जुलैपर्यंत करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. पण नंतर १० जुलै आणि त्यानंतर १३ जुलैपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. बुधवार, १५ जुलैपर्यंत देखील पगार झालेला नाही. पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं असं सांगितलं की, “आम्ही त्यांची फाईल पुढे पाठवली आहे. लवकरच त्यांचा पगार खात्यात जमा होईल.


हेही वाचा : कल्याण - डोंबिवलीत 'हे' आहेत कंटेन्मेंट झोन


साउथ एशिया चेप्टर ऑफ डॉक्टर्स विथ बॉर्डर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की, “मुंबईत आलेल्या सर्व ४० डॉक्टरांना मोबदला मिळालेला नाही. ते दोन महिने काम करणार होते. त्यापैकी पंधरा जणांनी गेल्या आठवड्यात पगाराच्या समस्येमुळे घरी परतण्याचा निर्णय घेतला.”

COVID 19 वाढता प्रसार पाहता केरळच्या डॉक्टरांटी तुकडी महाराष्ट्रात आली होती. जेणे करून केरळा पॅर्टननं कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. यासाठी साउथ एशिया चेप्टर ऑफ डॉक्टर्स विथ बॉर्डर्सनं जबाबदारी घेतली होती. त्यांनीच केरळातल्या डॉक्टरांना महाराष्ट्रात पाठवलं होतं.

जूनच्या अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांना आणखी एक पत्र लिहून महाराष्ट्रातील रूग्णालयात अधिक डॉक्टर पाठवण्याची विनंती केली होती. २२ जून रोजी केरळच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात ठाकरे यांनी केरळमधील वेगवेगळ्या आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची तुकडी पाठवण्याची विनंती केली होती.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना डॉक्टर्स विथ बॉर्डर्सच्या सदस्यांपैकी एकानं सांगितलं की, या मुद्द्यांमुळे केरळमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी महाराष्ट्रात येऊन काम करण्यास तयार नसतील. जे लोक स्वेच्छेनं काम करण्यास इच्छुक आहेत केवळ तेच राज्यात येऊन रुग्णांची सेवा करतील.



हेही वाचा

दादरमधील रुग्ण वाढीचा दर धारावीहून अधिक

महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे अवघ्या 'इतक्या' कोरोना चाचण्या

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा