Advertisement

महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे अवघ्या 'इतक्या' कोरोना चाचण्या

कोरोना चाचण्यांमध्ये देशात २२ राज्यांमध्ये महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे अवघ्या 'इतक्या' कोरोना चाचण्या
SHARES
कोरोना चाचण्यांमध्ये देशात २२ राज्यांमध्ये महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र, कोरोना चाचण्यांमध्ये महाराष्ट्राचं स्थान इतर राज्यांपेक्षा खाली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात १० लाख लोकसंख्येमागे १९८ कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत. ही संख्या गोवा, त्रिपुरा, दिल्ली, हरियाणा आणि कर्नाटकपेक्षा कमी आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने
आधीपासूनच देशात सर्वात जास्त चाचणी दर असल्याचा दावा केला आहे. १६ जुलै पर्यंत राज्यात कोरोनाच्या चाचणीा करणाऱ्या १०५ प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी ६१ सरकारी आणि ४४ खाजगी आहेत. २४ जूनपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ७३ कोरोना रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये ३८,५९४ आयसोलेशन बेड, ५९०० आयसीयू बेड आणि २२७१ व्हेंटिलेटर आहेत. या  रुग्णालयांकडे आरोग्य सुरक्षा कर्मचारी आणि रूग्णांसाठी २ लाख ८४ हजार पीपीई कीट आणि ४ लाख ६५ हजार २४९ एन ९५ मास्क उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळेची स्थापना करणार असल्याचं सांगितलं आहे. मराठवाड्यातील जालना शहरातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन नुकतंच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या ११० च्या वर गेली असल्याची माहिती दिली. देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा राज्यात चाचणी प्रयोगशाळांची संख्या दोनच होती. 



हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा