Advertisement

दादरमधील रुग्ण वाढीचा दर धारावीहून अधिक


दादरमधील रुग्ण वाढीचा दर धारावीहून अधिक
SHARES

कोरोना रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चाचली आहे. सुरुवातीला धारावी हा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता धारावी परिसर कोरोनामुक्तीच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. त्या उलट मुंबईतल्या दादर भागात परिस्थिती पाहायला मिळत आहे. दादरमधील नवीन आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, कोरोना रुग्णांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे.

सध्या दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर २ टक्के इतका आहे. तर धारावीत सध्या कोरोना रुग्णांचा वाढीचा दर ०.४१ टक्के आहे. यावरून दादर आता मुंबईतील नवीन हॉटस्पॉट ठरतोय की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महानगर क्षेत्रामध्ये धारावी मॉडेल राबवण्याची शिफारस अनेकांकडून केली जात आहे.

बुधवारी दादरमध्ये ५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर मंगळवारी ३१ नव्या रुग्णांची नोंद झाली. जी-उत्तर प्रभागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, अचानक रुग्णांची संख्या वाढली आहे. याचं कारण म्हणजे कोरोनाच्या होणाऱ्या चाचण्या आणि जागोजागी उभारण्यात येणारे ताप क्लिनिक आहे.


हेही वाचा : फोर्टमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल


जी-उत्तर प्रभागातील प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दादरमध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंब राहतात. त्यामुळे त्यांनी लॉकडाउन नियमांचे पालन केले आहे. तथापि, जूनमध्ये बाजारपेठा आणि दुकानं सुरू झाल्यामुळे बरेच लोक रस्त्यावर उतरले आणि काहीजण मास्क न लावता बाहेर पडले. त्यामुळे या भागात कोरोनाव्हायरसचे अधिक रुग्ण आढळत आहेत.

दादरमध्ये एकूण १ हजार २७७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ यावरूनच दिसून येते. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये २ लाख ७५ हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात अजून ८ हजार कोरोना रुग्ण नोंदवली गेली आहेत. दुसरीकडे, मुंबई महानगर प्रदेशात बुधवारी ६२ लोकांचा बळी गेला आहे. तर १ हजार ३९० नवीन रुग्ण आढळले आहेत.



हेही वाचा

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी १३४ नवे रुग्ण

वसई-विरारमध्ये ५६३ इमारती धोकादायक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा