Advertisement

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी १३४ नवे रुग्ण

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे १३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी १३४ नवे रुग्ण
SHARES

पनवेल महानगरपालिका हद्दीत गुरूवारी कोरोनाचे १३४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर  ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४४६९ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १०७ वर गेला आहे. 

नवीन रुग्णांपैकी पनवेलमधील ३२, नवीन पनवेलमधील १७, खांदा कॉलनी ८, कळंबोलीतील २१, कामोठे १९, खारघरमधील २२ आणि तळोजातील १५ रूग्णांचा समावेश आहे. गुरूवारी पनवेलमधील ३, नवीन पनवेलमधील २ तर कळंबोली आणि कामोठे परिसरातील प्रत्येकी १ अशा ७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 गुरूवारी१३९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पनवेल २५, नवीन पनवेल २०, कळंबोली १८, कामोठे ३६, खारघर ३५, तळोजातील ५ रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत २८९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १४७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा -

नवी मुंबईत गुरूवारी २७३ नव्या रुग्णांची नोंद

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा