Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी २७३ नव्या रुग्णांची नोंद

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन २७३ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी २७३ नव्या रुग्णांची नोंद
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन २७३ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ५४६ झाली आहे. 

कोरोनामुळे नवी मुंबईतील ३२२ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवी मुंबईत गेल्या ७ दिवसांमध्ये २०२८ रुग्ण सापडले आहेत. गुरूवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ५०, नेरुळ ४८, वाशी १९, तुर्भे २३, कोपरखैरणे ५१, घणसोली ३५, ऐरोली ४०, दिघा येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.

समाधानाची बाब म्हणजे  एका दिवसात १७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. बेलापूर १६, नेरुळ १८, वाशी १३, तुर्भे ५, कोपरखैरणे १८, घणसोली २१, ऐरोली ४९, दिघा ३० या परिसरातील रुग्ण बरे होऊन घरी गेल आहेत. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६५२० वर पोहोचली आहे.  सध्या नवी मुंबईत ३७०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.हेही वाचा -

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात
संबंधित विषय
Advertisement