Advertisement

फोर्टमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली 'भानुशाली' बिल्डिंगची एक बाजू कोसळल्यानंतर मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत.

फोर्टमधील इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल
SHARES

मुंबई (Mumbai News)तील फोर्ट भागातील GPO पोस्ट ऑफिस समोरील पाच मजली 'भानुशाली' बिल्डिंगची एक बाजू संध्याकाळी कोसळली. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली उडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अग्निशमन दलाच्या १४ गाड्या घटनास्थळी दाखल आहेत. NDRF देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि बीएमसी (BMC)चे आयुक्त इकबालसिंग चहल घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेची भीषणता लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घटनास्थळी पोहोचले आहेत. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि बीएमसी आयुक्त आयुक्त इकबालसिंग चहल यांच्याकडून घटनेचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

गुरूवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

भानुशाली बिल्डिंग मालकाचं नाव मोती भाटीया असं आहे. ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती समोर आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत 20 जण असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या इमारतीचा जवळपास ४० टक्के भाग कोसळला.

दरम्यान, इमारत कोसळण्याची गुरुवारी दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. मुंबईतील मालाडमध्ये देखील दुमजली घर कोसळलं. अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर ६ नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे.


हेही वाचा

मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू

मुंबईसह उपनगरात पावसाची तुफान बॅटींग


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा