Advertisement

मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू

आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्याखालून काढल्याचं समोर आलं आहे.

मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू
SHARES

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडच्या मालवणी परिसरात एक दुर्घटना घडली आहे. मालवणी परिसरातील एक दुमजली घर कोसळलं आहे. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

माहितीनुसार, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्याखालून काढल्याचं समोर आलं आहे. 

दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली दबून एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर ६ नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. अग्निशमन दलाचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, १ रेस्क्यू व्हॅन आणि १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेल्या ६ जणांना जवळच्या रुग्णालयात हलवलं आहे.
संबंधित विषय
Advertisement