Advertisement

मुंबई लोकल 'अशी' केली जातेय सॅनिटाईझ

कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे गाड्यांची साफसफाई आणि निर्जंतुकिकरण केलं जातं.

मुंबई लोकल 'अशी' केली जातेय सॅनिटाईझ
SHARES

अनलॉक १ जाहीर केल्यानंतर मुंबई अंतर्गत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. यात आत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास परवनागी देण्यात आली. पण, कोरोनाव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रेल्वे गाड्यांची साफसफाई आणि निर्जंतुकिकरण केलं जातं. साबण, सोडियम हायपोक्लोराइटसह रेल्वेचे डबे धुतले जात आहेत.

सध्या मध्य रेल्वे (सीआर) आणि वेस्टर्न रेल्वे (डब्ल्यूआर) या दोन्ही मार्गावर ७३ लोकल गाड्या (२०२ फेऱ्या) धावत आहेत. त्यापैकी ४१ गाड्या मध्य रेल्वेवर आणि ३२ सेवा पश्चिम मार्गावर धावत आहेत. या गाड्यांच्या प्रत्येक कोपऱ्यासह हँडल्स, सीट, दरवाजे, खांब स्वच्छ केले जात आहेत. त्याशिवाय रेल्वे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी चालक दल अर्थात लोको पायलटच्या प्रत्येक प्रवासानंतर ड्रायव्हिंग कॅबही साफ केली जाते.

लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हणतात. कोरोनो व्हायरसमुळे मार्चमध्ये त्याची सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली गेली होती. तथापि, आवश्यकता लक्षात घेऊन आणि राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारनं मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची सेवा १५ जूनपासून पुन्हा सुरू केली.


हेही वाचा : MSRTC Covid Center एसटीच्या कर्मचाऱ्यांंसाठी मुंबई सेन्ट्रल आगारात कोरोना केंद्र


कोरोनाव्हायरसच्या संख्येत होणारी वाढ टाळण्यासाठी, केवळ आवश्यक सेवा पुरवणाऱ्यांनाच रेल्वेमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात पोलिस, डॉक्टर, परिचारिका, नगरपालिका सफाई कामगार, वकील आणि पत्रकार अशा लोकांचा समावेश आहे.

१ जुलै रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आवश्यक कर्मचार्‍यांसाठी लोकल गाड्यांचा विस्तार करण्याची घोषणा केली. गोयल म्हणाले की, रेल्वे जुलै महिन्यापासून मुंबईत ३५० लोकल गाड्यांचा विस्तार करेल. म्हणजेच दोन्ही मार्गांवर अधिक गाड्या धावतील. ज्यामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी, प्राप्तिकर विभाग, सीमा शुल्क, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालये, सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँक कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबईची लाइफलाइन लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण

ऑगस्टमध्ये उपनगरी रेल्वेगाड्या सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार - अस्लम शेख

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा