Advertisement

MSRTC Covid center एसटीच्या कर्मचाऱ्यांंसाठी मुंबई सेन्ट्रल आगारात कोरोना केंद्र


MSRTC Covid center एसटीच्या कर्मचाऱ्यांंसाठी मुंबई सेन्ट्रल आगारात कोरोना केंद्र
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून एसटी महामंडळ एसटीच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत आहे. परंतु, कोरोनाची एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनाच लागण झाली. परिणामी, कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने अखेर एसटी महामंडळाने कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवर योग्य वेळी उपचार व्हावे यासाठी मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहात करोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पालिकेशी चर्चा करूनच अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. कामगारांची वाहतूक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा दिल्यानंतरही एप्रिल, मे महिन्यापर्यंत एसटीचा एकही कर्मचारी कोरोनाबाधित नव्हता. मात्र जून महिन्याच्या १५ तारखेनंतर कोरोनाबाधित कर्मचारी आढळून येऊ लागले. सध्याच्या घडीला राज्यात एसटीचे २७७ कोरोनाबाधित कर्मचारी असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामधील ११७ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले, तर १५४ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरूनगर, परळ, पनवेल, उरण आगारात मिळून ९७ आणि  ठाणे विभागाच्या खोपट, वंदना चित्रपटगृह, कल्याण, भिवंडी, शहापूर आगारांत ११३ कर्मचारी आहेत. दररोज सरासरी २ ते ४ कोरोनबाधित एसटी कर्मचाऱ्यांची भर पडत आहे.

कोरोनाच्या धास्तीने एसटीचे अनेक कर्मचारी गावी निघून गेले. म्हणून मुंबईतच करोना सेंटर उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासाठी पालिकेची मंजुरी आवश्यक असून कोरोना सेंटरही त्यांच्याच देखरेखीखाली उभारले जाणार आहे. हे सेंटर एसटीच्या मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात करण्याचा विचार आहे.हेही वाचा - 

University Exams 2020: अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच! राज्य सरकार निर्णयावर ठाम

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बससंबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा