Advertisement

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बस


मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बस
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. या लॉकडाऊनमुळं वाहतूक सेवा बंद होती. मात्र, काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर,'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सामान्यांना बस प्रवासाची परवानगी देण्यात आली. मात्र, लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू केल्यानं बेस्ट बसमध्ये प्रचंड गर्दी होत होती. परिणामी सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होत होतं. त्यामुळं बेस्टनं डबल डेकर बसची सेवा पुन्हा सुरू केली आहे. सोमवारपासून डबल डेकर बसच्या वाहतूक सेवेला सुरूवात करण्यात आली आहे. 

बेस्टनं ६० डबल डेकर बसेस सेवेला पुन्हा सुरूवात केली आहे. डबल डेकर बसमध्ये ९० प्रवासी बसण्याची व्यवस्था आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचा नियमाचं पालन व्हावं यासाठी बेस्टनं केवळ ४५ प्रवासी बसण्यीची मान्यता देण्यात आली आहे. त्याशिवाय, बेस्टनं प्रवाशांच्या पासाचं नूतनीकरण सुरू केलं आहे.

बेस्टनं रिडींग करण्यास सुरूवात केली असून, वीज बिले पाठवित आहे. कन्टेमेन्ट झोन वगळता सर्वत्र मीटरचं रिडींग करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. वीज कंपन्यांनी दोन महिन्यांच्या कालावधीनंतर जूनमध्ये मीटर रीडिंग तपासण्यास सुरूवात असल्यामुळे जास्त वीज बिले आल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (एमईआरसी) निर्देशानुसार २२ मार्चपासून मीटरचे वाचन बंद करण्यात आले होते. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा