Advertisement

डोंबिवलीतील कारखान्यांना युद्धाचा फटका

पीएनजी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध साठा मर्यादित असल्याने उद्योगांनी पर्यायी इंधनाचा विचार करण्याच्या इशाऱ्यामुळे येथील कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

डोंबिवलीतील कारखान्यांना युद्धाचा फटका
SHARES

कल्याण (kalyan)-डोंबिवली (dombivli) परिसरातील अनेक उद्योगपती आणि कामगारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. उद्योजकांनी पर्यायी इंधनाचा विचार करावा, असे निर्देश देण्यात आल्याने उद्योग क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. देवेन सोनी यांनी दिली.

डॉ. सोनी पुढे म्हणाले की, प्रदूषणाचा विचार करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना एलडीओ (कमी घनतेचे तेल) ऐवजी पीएनजी (Piped Natural Gas) म्हणजे पाईपलाइनद्वारे पुरविण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.

त्यानुसार सुमारे 70 टक्के कारखाने सध्या पीएनजीचा (PNG) वापर करत आहेत. त्यामुळे कारखान्यांतून (factories) होणारे प्रदूषण व काळा धूर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

मात्र आता आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम पीएनजी पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पीएनजी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी उपलब्ध साठा मर्यादित असल्याने उद्योगांनी पर्यायी इंधनाचा विचार करावा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारखान्यांतील कामगार वर्गही यामुळे अस्वस्थ आहे. कारखान्यांना लागणारे कच्चा माल वेळेवर मिळत नसून त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे.

याचा थेट परिणाम उद्योगांवर होत असून काही उद्योग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर मोठा परिणाम झाला आहेत. त्यामुळे आयात-निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत.

कच्च्या मालाच्या पुरवठ्यात विलंब होत असून त्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. परिणामी मागणी आणि पुरवठा यामध्ये समतोल राखताना उद्योगांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, युद्ध जर लवकर थांबले नाही तर येत्या काही दिवसांत अनेक कारखान्यांना उत्पादन कमी करावे किंवा तात्पुरते बंद ठेवावे लागू शकते.

तसेच त्याचा थेट परिणाम 10 ते 12 लाख कामगार (workers) आणि तंत्रज्ञांच्या रोजगारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भाजीपाला आणि फळांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. विशेषतः कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात घटली आहे. हजारो टन कांदा जेएनपीटी बंदरात अडकून पडल्याने तो पुन्हा स्थानिक बाजारात आणावा लागल्याची माहिती मिळत आहे.

याशिवाय निर्यात प्रक्रियेलाही मोठा फटका बसत आहे. तयार मालाची निर्यात उशिरा होत असल्याने अनेक उद्योगांना उत्पादन कमी करावे लागत आहे.

काही उद्योगांमध्ये कच्च्या मालाचा साठा संपत आल्याने उत्पादन पूर्णपणे थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



हेही वाचा

वसई-विरारमधील हॉटेल्सवर टांगती तलवार

महाराष्ट्रात वादळाचा अंदाज

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा