
भारतीय हवामान विभागाने (IMD) या आठवड्यात उत्तर कोकण प्रदेशात तो मुंबई (mumbai), ठाणे, पालघर वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) वादळासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
उष्णतेच्या लाटेचा (heat waves) कोणताही इशारा देण्यात आलेला नसला तरी मुंबई आणि त्याच्या महानगरांमध्ये तापमान सामान्य स्तरापेक्षा जास्त राहणार आहे.
रविवारी मुंबईच्या सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 31.9 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
हा आकडा सामान्य तापमानापेक्षा 2.6 अंश सेल्सिअसने जास्त होता. तसेच आर्द्रतेचे प्रमाण 85% होते. या आठवड्यात या भागात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 48 तासांसाठी आयएमडीच्या (IMD) स्थानिक हवामान अंदाजानुसार, सकाळी धुके असेल आणि दुपारी किंवा संध्याकाळी आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33°C आणि 22°C च्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात पारा 40 अंश सेल्सिअस ओलांडल्यानंतर, आठवड्याच्या शेवटी शहराच्या कमाल तापमानात घट झाली.
मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यात उत्तर कोकणात उष्णतेच्या तीन लाटा आल्या होत्या. इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
मार्च ते मे 2026 साठी आयएमडीच्या उष्ण हवामान अंदाजानुसार, एप्रिल आणि मे मध्ये अधिक उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा
