अश्लील फोटोच्या मदतीने ‘तो’ करत होता तिला ब्लॅकमेल

संबध ठेवण्यास नकार दिल्यास तो तिला ते फोटो सोशल मिडियावर किंवा तिच्या नातेवाईंकाना पाठवण्याची धमकी द्यायचा.

अश्लील फोटोच्या मदतीने ‘तो’ करत होता तिला ब्लॅकमेल
SHARES

लग्नाचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार देणाऱ्या २६ वर्षीय तरुणा विरोधात मालाडच्या (Malad ) मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. योगेश भद्रा असे या आरोपीचे नाव आहे. योगेशचे नुकतेच पुण्यात बी.ए.एम.एसचे शिक्षण झाले आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस (Malvani Police) अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती

मालाडच्या मालवणी (Malvani)  परिसरात राहणारी २० वर्षीय तरुणी नुट्रीशनिस्ट आहे. पाच वर्षापूर्वी तिच्या परिसरात रहात असलेल्या एका तरुणाकडे आरोपी योगेश भद्रा हा येत होता. त्यावेळी तिची आरोपीसोबत  ओळख झाली होती. दोघांच्या मैत्रिचे रुपांतर कालांतराने प्रेमात झाले. योगेश हा पुण्यातून बी.ए.एम.एसचे शिक्षण घेत होता. मुंबईत सुट्टी निमित्ताने  तो त्याच्या आत्याकडे यायचा. लग्नाचे आमीष दाखवून योगेशने पीडित तरुणीशी अनेकदा शारिरीक संबध ठेवले. तसेच अनेकदा पीडितेने संबध ठेवण्यास नकार दिल्यास तो तिला मारहाण करायचा. पीडितेच्या न कळत त्याने तिचे काही अश्लील फोटो (Pornographic photos ) ही काढले होते. पीडितेने संबध ठेवण्यास नकार दिल्यास तो तिला ते फोटो सोशल मिडियावर किंवा तिच्या  नातेवाईंकाना पाठवण्याची धमकी द्यायचा. तसेच त्याने तरुणीकडून एक महागडा मोबाइल आणि तरुणीची गाडीही स्वतःजवळच ठेवून घेत, त्यावर मौजमजा मारत होता.

हेही वाचाः- महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी

कालांतराने पीडित तरुणीने योगेशजवळ लग्नासाठी तगादा लावला. त्यावेळी योगेशने तिला लग्नासाठी नकार दिला. पीडित तरुणीने योगेशबद्दलची माहिती काढली असताना. तो अन्य दोन मुलींशीही प्रेमसंबध ठेवून त्यांना फसवणूक करत असल्याचे लक्षात आले.  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने मालवणी पोलिसात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी ३७६(३),४०६,३२३,५०४,५०६ भा.द.विसह, ४,५,(एल)६ पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा