Advertisement

मालवणीतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

मालवणीतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखांची मदत
SHARES

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडच्या मालवणी परिसरातील एका दुमजली चाळीतील घर कोसळून त्यात २ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.  (malvani malad building collapse victims will get 4 lakh rupees each from maharashtra government)

यासंदर्भात माहिती देताना आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, मालाड, मालवणी येथील इमारत दुर्घटनेतील दुर्घटनाग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात येत आहे.


मुसळधार पावसामुळे गुरूवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मालवणी परिसरातील एक दुमजली घर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, १ रेस्क्यू व्हॅन आणि १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर रेस्क्यू आॅपरेशन सुरू झालं.  

शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे ६ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं होतं. तर ढिगाऱ्याखाली दबून एका १२ वर्षाच्या मुलासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलेल्या ६ जणांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा