Advertisement

मालाडमधल्या ९००० नागरिकांची होणार मोफत अँटीजेन टेस्ट

मालाडमधील सुमारे ९००० रहिवाशांची खासगी प्रयोगशाळांमध्ये मोफत अँटीजेन चाचणी घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.

मालाडमधल्या ९००० नागरिकांची होणार मोफत अँटीजेन टेस्ट
SHARES

मालाडमधील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढल्याचं समोर येत आहे. या भागातही कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहे. मालाडमध्ये सध्या ४४ दिवसांत कोरोना रूग्णांची संख्या दुप्पट होत आहे.

पी/उत्तर प्रभागात COVID 19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॅबिनेट मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेला मालाडमधील सुमारे ९००० रहिवाशांची खासगी प्रयोगशाळांमध्ये मोफत अँटीजेन चाचणी घेण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.


हेही वाचा : केरळावरून महाराष्ट्रात आलेल्या ४० डॉक्टरांचा पगार अजूनही थकीत


अधिकाऱ्यांना हे देखील आदेश दिले आहेत की, जर अधिक चाचण्या घेण्याची आवश्यक्ता असेल तर त्या घ्याव्यात. मालाडमधील कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी पालिका या भागात यापूर्वीच डोअर टू डोअर स्क्रीनिंग करत आहे. यासह विविध भागात वैद्यकीय शिबिरांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील उपनगरामध्ये डोर-टू-डोर सेवा देण्यासाठी पालिका स्थानिक डॉक्टरांशी सहकार्य करत आहे. धारावी आणि वरळीमध्ये प्रभावी ठरणारा रॅपिड अ‍ॅक्शन प्लॅन (RAP) मुलुंड-भांडुप आणि दहिसर-बोरिवली-कांदिवली-मालाड उपनगरांमध्ये राबवला जात आहे. जिथे दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळतात.



हेही वाचा

दादरमधील रुग्ण वाढीचा दर धारावीहून अधिक

मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, एकाचा मृत्यू


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा