Advertisement

मुंबईत कोरोनाचे १४९८ नवे रुग्ण, ५६ जणांचा मृत्यू

गुरूवारी दिवसभरात ७०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६८ हजार ५३७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत कोरोनाचे १४९८ नवे रुग्ण, ५६ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गुरूवारी राज्यात कोरोनाचे २६६ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत गुरूवारी दिवसभरात १४९८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत गुरूवारी दिवसभरात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- फोर्ट परीसरात ५ मजली इमारत कोसळली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत गुरूवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५६ रुग्ण दगावले आहेत. तर १३ जुलै रोजी ४७ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी १२ जुलै रोजी एकूण ४४ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, गुरूवारी मुंबईत कोरोनाचे १४९८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ९७ हजार ७५१ इतकी झाली आहे. तर गुरूवारी दिवसभरात ७०७ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ६८ हजार ५३७ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- मुसळधार पावसाने मुंबईचे केले ‘इतके’ नुकसान

राज्यात आज ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ लाख  ४६ हजार ३८६ नमुन्यांपैकी २ लाख ८४ हजार २८१ नमुने पॉझिटिव्ह (१९.६५टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख १० हजार ३९४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ८३३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २६६ मृत्यू हे मुंबई मनपा-५६, ठाणे-११, ठाणे मनपा-१७, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-१८,भिवंडी-निजामपूर मनपा-१३, मीरा-भाईंदर मनपा- २२, पालघर-२, वसई-विरार मनपा-४, रायगड-२५, पनवेल मनपा-५, नाशिक-२, नाशिक मनपा-७, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, जळगाव-२, नंदूरबार-५, पुणे-२, पुणे मनपा-१९, पिंपरी-चिंचवड मनपा-१६,सोलापूर मनपा-१, कोल्हापूर मनपा-२, रत्नागिरी-१,औरंगाबाद मनपा-५, लातूर-१, लातूर मनपा-३, उस्मानाबाद-४, बीड-२, अकोला-१,अमरावती-२, अमरावती मनपा-१, यवतमाळ-२, बुलढाणा-३ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा