मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह उद्गार, मालवणी पोलिसांनी केली एकाला अटक

मनसेने बांगलादेशींविरोधात उचललेल्या पाऊलावर त्याने आक्षेप घेत शिवीगाळ केली आहे. ऐवढ्यावरच न थांबता त्याने मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंना लक्ष करत, त्यांना उद्देशून अनेक अपशब्द वापरले आहेत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह उद्गार, मालवणी पोलिसांनी केली एकाला अटक
SHARES

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यास मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. हसन कोटी असे या आरोपीचे नाव आहे. एक  व्हिडिओ काढून त्याने मनसे, प्रसारमाध्यम आणि शिवाजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.  उद्या त्याला बोरिवली न्यायालयात हजर केले जाणार आहे. 



मुंबईत मागील अनेक दिवसांपासून सीसीए आणि एनआरसी विरोधात वातावरण पेटले असताना. मुंबईच्या मालवणीतील हसन कोटी या विकृताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याने प्रशोभक वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे मनसेने बांगलादेशींविरोधात उचललेल्या पाऊलावर त्याने आक्षेप घेत शिवीगाळ केली आहे. ऐवढ्यावरच न थांबता त्याने मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरेंना लक्ष करत, त्यांना  उद्देशून अनेक अपशब्द वापरले आहेत. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ही अपमानास्पद केला आहे. तर सरकार आणि पोलिसांवर ही त्याने टिका केली आहे. 


हसन कोटी हा मालाड मालवणीच्या जुने कलेक्टर कंपाऊड गेट नं ५ येथे राहतो. त्यांने व्हिडिओत पश्चिम बंगालहून आलेल्या कामगारांना मुंबईत मनसैनिकांकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाविरोधात त्याने हा व्हिडिओ काढून पसरवला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून जनसमान्यांकडून या व्हिडिओबाबत तिखट प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस ठाण्यात हसन कोटी विरोधात १५३(अ), २९५ (अ),२९८, ५०४, ,५०६,३४ भा.द.वि अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  त्याला शनिवारी बोरिवली न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा