Advertisement

गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

मुख्यमंत्र्यांनी यावर भर दिला की, हा उत्सव शिस्तीने आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा केला जावा.

गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई
SHARES

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आगामी गणेशोत्सवाच्या काळात डीजे (DJ), ध्वनिक्षेपक (Loudspeakers) आणि फटाक्यांच्या वापराबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

मुंबईतील (mumbai) सह्याद्री अतिथीगृहात कायदा-सुव्यवस्था आणि उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत फडणवीस यांनी हे निर्देश दिले.

तसेच, गणेश मंडळांनी प्रसाद वाटपादरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, याची खात्री करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

उत्सवाचे पारंपरिक आणि सामाजिक महत्त्व जपून, तो शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा केला जावा, यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, गणेश मंडळे आणि समन्वय समित्या यांच्यात उत्तम समन्वय असावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यातील एका अलीकडील बैठकीचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना सांगितले की, गणेशोत्सवादरम्यान डीजे यंत्रणा आणि आवाजाच्या पातळीवरून गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी.

मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधील मिरवणूक व विसर्जनाचे मार्ग सुस्थितीत असावेत, ते खड्डेमुक्त असावेत आणि रात्रीच्या वेळी तिथे पुरेसा प्रकाश असावा, याची खात्री करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

फटाके आणि ध्वनिक्षेपकांशी संबंधित नियमांच्या उल्लंघनावर लक्ष ठेवण्याचे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गणेशोत्सवातील (Ganeshotsav), विशेषतः मुंबईतील लोकांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग कौतुकास्पद आहे; मात्र शिस्त राखणे आणि उत्सवाची पावित्र्य जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मूर्तींची मिरवणूक आणि विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकार, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गणेश मंडळे यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे नद्या आणि समुद्रात विसर्जन केल्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जात असल्याचेही सरकारने स्पष्ट केले.



हेही वाचा

ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एक वर्ष

मेट्रो 7A च्या कामात मोठा अडथळा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा