Advertisement

मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती, 'इतका' मिळणार पगार

२०३ विविध पदांसाठी ही भरती होत असून यासाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती, 'इतका' मिळणार पगार
SHARES

राज्यासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत चालला आहे. या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष कोव्हिड उपचार केंद्रं तसंच, विविध रुग्णालयं इथं पॅरामेडिकल संवर्गातील कंत्राटी पद्धतीनं तात्पुरत्या स्वरूपात ३ महिन्यांच्या कालावधीसाठी ठोक मानधन तत्त्वावर भरती होत आहे. एकूण २०३ विविध पदांसाठी ही भरती होत असून यासाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

रिक्त पदं

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ५१ पदे. पात्रता – बी.एस्सी. + डीएम्एल्टी उत्तीर्ण किंवा १२वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिनमधील पदवी उत्तीर्ण.

क्ष-किरण तंत्रज्ञ – ५२ पदे. पात्रता – १२वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफीमधील पदवी उत्तीर्ण किंवा बी.एस्सी. + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव किंवा १२वी (विज्ञान/टउश्उ) + रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण आणि २ वर्षांचा अनुभव.

ई.सी.जी. तंत्रज्ञ – ३९ पदे. पात्रता – १२वी + पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजीमधील ३ १/२ वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण.

औषध निर्माता – ६१ पदे. पात्रता – डी.फार्म./बी.फार्म. (उमेदवार महाराष्ट्र राज्य फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा.)

वयोमर्यादा – १ जुलै २०२० रोजी १८ ते ५० वर्षे.

वेतन – सर्व पदांकरिता ठोक मानधन रु. ३०,०००/- प्रतीमाह.

निवड पद्धती – उमेदवारांनी अंतिम वर्षाच्या पदवी/पदविका परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार निवड केली जाईल. (पदविका/पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांमधून प्रत्येक प्रयत्नासाठी १० गुण वजा केले जातील.)

अर्जाचा विहीत नमुना –  https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीसोबत उपलब्ध आहे.

अर्ज व्यक्तिश: सादर करण्याचे ठिकाण : ‘प्रवैअ व खाप्र (माआसे) यांचे कार्यालय, सातवा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर्.के. पारकर मार्ग, बांद्रा (प.), मुंबई – ४०००५०.

उमेदवारांनी आपले अर्ज व्यक्तिशः अथवा ई-मेलद्वारे कागदपत्रांच्या/गुणपत्रिकांच्या/प्रमाणपत्रांच्या स्कॅन कॉपीसह दि. २४ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत ao03cms.ph@mcgm.gov.in या ई-मेल आयडीवर अपलोड करावेत.



हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा