
शाळेच्या ऑनलाइन पोर्टलवर हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. पर्युषण काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही हे खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. मात्र, या निर्णयाला पालक, राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र विरोध झाला.
गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शाळेत जाऊन 24 तासांत परिपत्रक मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. मराठी एकीकरण समितीनेही शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
विद्यार्थ्यांच्या आहारावर धार्मिक सणाच्या नावाखाली निर्बंध लादण्याच्या निर्णयावर पालक आणि विविध संघटनांनी प्रश्न उपस्थित केले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही नरेंद्र मेहता यांच्यावर टीका करत हा निर्णय दुटप्पीपणाचा असल्याचे म्हटले.
मेहता यांच्या क्लब आणि हॉटेलमध्येही अशाच प्रकारचे निर्बंध लागू आहेत का, असा सवाल त्यांनी केला. तसेच हिंदू धर्मातील उपवासाच्या दिवसांवरून भाजपवरही त्यांनी निशाणा साधला.
या सर्व विरोधानंतर गुरुवारी रात्री उशिरा शाळेने आपल्या ऑनलाइन पोर्टलवरून हे परिपत्रक हटवले. मनसे आणि मराठी एकीकरण समितीने शाळेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना हे परिपत्रक केवळ विद्यार्थ्यांना केलेले आवाहन होते, त्याची सक्ती करण्यात येणार नव्हती, असा दावा केला आहे.
हेही वाचा
