Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

जगभर जे निरीक्षण सुरू आहे, त्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. दुसरी लाट तेव्हाच येते, ज्यावेळी आपण गाफील राहतो. त्यामुळे आपण आणखी सतर्क राहूया.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
SHARES

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या मुंबईसारख्या शहराकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु मुंबईत अत्यंत प्रयत्नाने या विषाणूचा संसर्ग रोखण्यात येत आहे. जगभर जे निरीक्षण सुरू आहे, त्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. दुसरी लाट तेव्हाच येते, ज्यावेळी आपण गाफील राहतो. त्यामुळे आपण आणखी सतर्क राहूया. रुग्णसंख्येचा हा आलेख कमी होईल यासाठी प्रयत्न करूया, असं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध तसंच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. (be ready for second wave of coronavirus maharashtra cm uddhav thackeray directs to bmc officials)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांनी अहोरात्र मेहनतीन करून मुंबईतील कोरोनाचं संकट काबूत ठेवलं आहे. या कामाची दखल डब्लूएचओ आणि वाश्गिंटन पोस्टने घेतली आहे. आपण कोणतीही माहिती लपवत नाही, याचं कौतुक वाश्गिंटन पोस्टने केलं. या कौतुकास्पद परिस्थितीतही आता आपली कसोटी आहे.

सतर्क रहा

जगभर जे निरीक्षण सुरू आहे, त्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. दुसरी लाट तेव्हाच येते, ज्यावेळी आपण गाफील राहतो. त्यामुळे आपण आणखी सतर्क राहूया. रुग्णसंख्येचा हा आलेख कमी होईल यासाठी प्रयत्न करूया. रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावं लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. सुरूवातीला कोरोना शहरात होता. आता प्रसार ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. राज्याच्या अन्य भागातही या सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

हळूहळू आपण मुंबई खुली करतो आहोत. त्यासाठी कुणाचा दबाव घेण्यापेक्षा मुंबईला सर्वांच्या अनुभवातून पूर्वपदावर आणायचं आहे. व्हॅक्सिन येईपर्यंत आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे प्रयत्न आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती

नालेसफाईकडे लक्ष

मुंबईतील नालेसफाई आणि पावसाळ्यातील साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ते म्हणाले, नालेसफाई वर्षोनुवर्ष करतो. पण साफ झालेला नाला पुन्हा काही दिवसांत कचऱ्याने भरतो. आता कोरोनाच्या निमित्ताने आपल्या टीम बाहेर आहेतच. त्यांच्याकडून या कचरा टाकण्यावर लक्ष ठेवा. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींकडेही लक्ष देण्याची गरज आहे. त्याठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर आदी अनुषंगिक सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात याची काळजी घ्या.

चाचण्या वाढवण्यावर भर

महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुंबईतील ८३१ प्रतिबंधित क्षेत्र १५३ ने कमी करण्यात यश आलं आहे. सील इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करणार आहोत. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने डॅशबोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहोत. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या ५ दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबिरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल. मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिस यांना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. जिथे रुग्ण आढळून येतात, तेथे एकत्रित जाऊन डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याची तसेच २२४ प्रभागात फवारणी सुरु आहे. टाक्यांच्या निर्जंतुकीकरणावर भर देण्यात येत आहे, असंही ते म्हणाले.

 हेही वाचा- महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा