जी.व्हि.के ग्रुपचे चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्या अडचणीत वाढ, सीबीआयने फास आवळला

मुंबई विमानतळाच्या आसपास २०० एकर अविकसित जमीनवर रिअल इस्टेट विकसित केली गेली आहे. त्यावेळी गैरव्यवहार झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

जी.व्हि.के ग्रुपचे चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्या अडचणीत वाढ,  सीबीआयने फास आवळला
SHARES

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Mumbai airport) कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. या प्रकरणात सीबीआय (CBI) आणि ईडी स्वतंत्र तपास करत आहे. या प्रकरणात जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीचे (GVK Group of Companies ) चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्यावर ८०५ कोटींच्या गैरव्यवहाराचा दावा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) दाखल केलेल्या खटल्यात भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आणि नऊ अन्य खासगी कंपन्यांचेही नाव असून एफआयआरनुसार, सर्वांनी स्वतःसाठी आणि २०१२-२०१८ दरम्यान ८०५ कोटींपेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या फायद्याकरून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार  केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) आता नऊ संशयीत कंत्राटांवर तपास केंद्रीत केला आहे. त्यातील सात जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचाः- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड किंवा एमआयएएल नावाची संयुक्त कंपनी जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड, एअरपोर्ट ऑथॉरिटी इंडिया आणि इतर काही विदेशी संस्थांनी तयार केली होती. त्यात जीव्हीकेचे ५०.५ टक्के शेअर्स आहेत आणि २६ टक्के एएआयकडे आहेत.जीव्हीके रेड्डी एमआयएएलचे चेअरमन आहेत आणि जीआयव्ही संजय रेड्डी यांचेही एफआयआरमध्ये नाव आहे, ते एमआयएएलचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तपास यंत्रणेने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला आहे की, आरोपींनी इतर नऊ खासगी कंपन्यांशी करार करून ३१० कोटींची फसवणूक केली आहे. तसेच२०१७-१८ दरम्यान मुंबई विमानतळाच्या आसपास २०० एकर अविकसित जमीनवर रिअल इस्टेट विकसित केली गेली आहे, ऐवढ्यावरच न थांबता "जीएके ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रवर्तकांनी एआयएला नुकसान पोहचविण्याच्या हेतूने २०१२ ते २०१ ८ दरम्यान एमआयएएलच्या अतिरिक्त रकमेवर काम केले असल्याचे आरोप सीबीआयने लावलेले आहेत. तसेच एमआयएएलमध्ये एमआयएएलचा खर्च वाढविण्यासाठी जीव्हीके ग्रुप ऑफ कंपनीच्या प्रवर्तकांनी संयुक्त उद्यम कंपनीच्या १०० कोटींपेक्षा जास्त रक्कम लाटल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

हेही वाचाः- अश्लील फोटोच्या मदतीने ‘तो’ करत होता तिला ब्लॅकमेल

याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत कंत्राट दिलेल्या ७  जणांचे जबाब नोंदवलेले आहे. हे सर्व जण या प्रकरणाशी संबंधीत अधिकारी असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी  सांगितले. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला, ही बाब आश्चर्चकारक असल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटले होते. याप्रकरणी तपासात यापूर्वीही यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करण्यात आले आहे. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड पारदर्शक व जबाबदार कंपनी असून ती यंत्रणेला तपासात सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली होती.


 
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा